अकोल्यात भाजप पिछाडीवर, कॉंग्रेसचे अभय पाटील 4488 मतांनी आघाडीवर
Akola Loksabha : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) मतमोजणी सुरू होऊन सुमारे दीड तास उलटला आहे अकोला लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. या दोन्ही फेऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) आणि भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांच्यात काट्याची लढत झाल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. पाटील 4488 मतांनी आघाडीवर आहेत.
एमआयडीसीतील वखार निगमच्या मतमोजणी केंद्रावर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीनुसार भाजपचे अनुप धोत्रे यांना 30, 802 दोन मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे डॉ.अभय पाटील यांना 35, 290 तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना 22, 789 मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांना 4488 मते मिळाली असून त्यांची आघाडी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Baramati Loksabha : नणंद-भावजयीमध्ये कडवी झुंज; सुप्रिया सुळेंची 19 हजार मतांची आघाडी… –
अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत झाली आहे. मतममोजणीच्या अजूनही बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे पुढच्या फेऱ्यात अभय पाटलांची घाडी कायम राहणार की भाजप, वंचितचे उमेदवार आघाडी घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे. मतदारसंघात यंदा कोणचे वर्चस्व राहणार आहे, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे