सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही आहात का? उद्धव ठाकरेंना अमित शहांचा प्रश्न
Amit Shah On Uddhav Thackeray : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज धुळे येथे महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सुभाष भामरे (Subhash Bhamre) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली आहे. या जाहीर सभेत बोलताना अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करत धुळे लोकसभा मतदारसंघातून (Dhule Lok Sabha) महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांना निवडणून देण्याचे आवाहन केले.
या सभेत बोलतान, काँग्रेस नेते आतंकी अजमल कसाबचा समर्थन करत आहे, ट्रिपल तलाक काँग्रेस पार्टी पुन्हा आण्याचा प्रत्यन करत आहे, राहुल गांधी आणि काँग्रेसपक्ष वीर सावरकरांचा विरोध करतात, स्टालिन आणि कंपनी सनातन धर्माला विरोध करत आहे तुम्ही त्यांच्यासोबत आहात का? असा प्रश्न विचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला.
अमित शहा म्हणाले, या निवडणुकीत एकीकडे नरेंद्र मोदी (Narendra Modi) आहे तर दुसरीकडे राहुल गांधी आहे. या निवडणुकीत तुम्हाला दोघांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या टर्ममध्ये राम मंदिर तयार करून प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम केला मात्र काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंनी याला विरोध केला त्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा निमंत्रण स्वीकारले नाही. असं देखील अमित शहा म्हणाले.
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, गेल्या 10 वर्षात मोदींनी देशाला सुरक्षित ठेवले आहे. मोदींनी कलम 370 रद्द करून काश्मीरवर तिरंगा झळकवला. उद्धव ठाकरे यांच्यात नैतिकता असेल तर कलम 370 हटवायला पाहिजे होते की नाही हे त्यांनी सांगावे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
राहुल गांधी देशाला सुरक्षित ठेवू शकत नाही. तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही देशाला जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था असणारा राष्ट्र बनवणार असं देखील यावेळी अमित शहा म्हणाले. तर सुभाष भामरे आणि देवेंद्र फडणवीसांनी मिळून धुळेमध्ये पाणीचा प्रश्न मिटवला.
मुस्लिम महिलांचे बुरखे हटवले; भाजप उमेदवाराचा प्रताप, गुन्हा दाखल!
राहुल गांधी देशाचा विकास करू शकत नाही, देश सुरक्षित ठेवू शकत नाही म्हणून 20 मे रोजी नरेंद्र मोदींना जिंकून देण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांना निवडणून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केला.