अजितदादा तगडी आसामी, त्यांनी आधी धाडस दाखवलं नाही, आता पोरासोरांना…; थोरांताचा टोला

अजितदादा तगडी आसामी, त्यांनी आधी धाडस दाखवलं नाही, आता पोरासोरांना…; थोरांताचा टोला

Balasaheb Thorat on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आज महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांच्या प्रचारार्थ पारनेरमध्ये सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंना आव्हान दिलं. निलेश बेटा, तू ज्या शाळेचा विद्यार्थी आहेस, त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे. तू कसा खासदार होतो, तेच बघतो, असं चॅलेंज अजितदादांनी दिलं. त्यावर आता त्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अजित पवारांवर शेलक्या भाषेत टीका केली आहे.

केजरीवाल अ‍ॅक्शनमोडमध्ये! भाजपचा रथ रोखण्यासाठी महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात घेणार सभा 

संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलत असतांना बाळासाहेब थोरातांनी अनेक विषयांवर भाष्य कलं. यावेळी बोलतांना त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, अजित पवारांना आपण धाडसी आहोत हे दाखविण्याच्या अनेक संधी होत्या. मात्र, त्यांनी त्या गमावल्या. अजित पवार हे राज्यातील तगडी आसामी आहेत. मात्र त्यांनी पोरांसोरांना दमबाजी करणं सुरू केलं. निलेश लंकेना दमबाजी करून काहीही होणार नाही. कारण आता निलेश लंकेंना विजयी करण्याचा निर्धार जनेतने केला आहे, असं थोरात म्हणाले.

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल आणि चौथ्या टप्प्यातही आघाडी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. संपूर्ण महाराष्ट्रील जनता महाविकास आघाडी बरोबर आहे. नगरमधील दोन्ही जागा आमच्याच आहेत. त्यामुळे आमचे यश निश्चित आहे, असं थोरात म्हणाले.

मोदींचा आत्मविश्वास कमी झाला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना एनडीएत येण्याची ऑफर दिली आहे. त्यावर थोरात म्हणाले, पंतप्रधान म्हणून मोदींचा आम्ही आदर करतो. त्यांनी कोणती विकास कामे केली आणि त्याचं पुढचं व्हिजन काय आहे, हे सांगायला हवं होतं. पण मोदी फक्त शब्दच्छल आणि दिशाभूल करत आहे. आता शेवटच्या टप्प्यात त्यांना बहुमत मिळेल असे वाटत नाही. यातूनच ते सर्वांना जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. या वक्तव्यामुळे मोदींचा आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसतं, अशी टीका थोरातांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube