आढळरावांनी मोहितेंच्या घरी चहा घेतला ; वीस वर्षांचा वाद सांगत मोहितेंनी तोफ डागली !

  • Written By: Published:
आढळरावांनी मोहितेंच्या घरी चहा घेतला ; वीस वर्षांचा वाद सांगत मोहितेंनी तोफ डागली !

Dilip Mohite Patil on Shivajirao Adhalrao patil : शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघातून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) हे अजित पवार गटाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तशी तयारीही आढळराव पाटील यांनी सुरू केली आहे. आढळराव पाटील (Dilip Mohite Patil) यांनी शनिवारी कट्टर राजकीय विरोधक अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेतली. दोघांमधील वीस वर्षांचा राजकीय संघर्ष मिटेल आणि दोघांची दिलजमाई होईल, असे वाटत होते. परंतु दुसऱ्याच दिवशी दिलीप मोहिते यांनी आढळराव पाटलांवर तोफ डागली आहे.

ममतांनी केली 42 उमेदवारांची घोषणा: युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद यांना लॉटरी

आढळराव पाटील यांच्याबरोबर झालेल्या भेटीवर दिलीप मोहिते म्हणाले, माझ्या भूमिकेशी मी ठाम आहे. आढळराव पाटील हे घरी आल्याने त्यांचा पाहुणचार केला. ते उमेदवार म्हणून घरी आले नव्हते. त्यावर चर्चाही झालेली नाही. आमच्यातील मतभेद टोकाचे आहेत. आज महायुतीच्या माध्यमातून आम्ही एकत्र असले तरी सुध्दा आमच्यातील मतभेद मिटले नाहीत. लोकसभा निवडणुकीत पुन्हा संधी मिळेल असे त्यांना वाटत आहे. त्या माध्यमातून त्यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभेचा प्रचार करा, असे त्यांनी सांगितलेले नाही. आढळराव पाटील यांनी मला जीवनात खूप त्रास दिला आहे. आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला आहे. ते मी कधी विसरणार नाही, असे आमदार मोहिते म्हणाले.

‘…तर मी तुमच्यासोबत नसेल’, भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार का?


तर मी घरी बसणार

पक्षाने आढळराव पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरविले, तर या परिस्थितीत मी घरी बसेल, असा इशाराच आमदार दिलीप मोहिते यांनी दिला आहे. मागे सुध्दा मला विश्वासात न घेता तीन वेळा उमेदवार दिला होता. आम्हाला कष्ट करून दुख:च मिळणार असेल तर माघार घेणेच योग्य राहील, असे मोहिते म्हणाले.

पक्ष नेतृत्त्वालाही सुनावले

उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्व अधिकार दिलीप वळसे पाटील यांनाही यापूर्वीच होते. आपल्यासमोर उमेदवार कोण राहणार हे माहित असल्याने आधीच उमेदवार शोधणे आवश्यक होते. दिलीप वळसे पाटील यांनी माघार घेतल्यानंतर लगेच उमेदवार शोधला पाहिजे होता. एेनवेळी उमेदवार निवडून येत नाही. गेल्या पाच वेळा खेडमधून निवडून लढलो आहे. तीन वेळा आमदार झालो आहे. पक्षात मी वरिष्ठ आहे. यापूर्वी पक्षाने लोकसभेचे उमेदवारी देताना विश्वासात घेतले नाही. यावेळी विश्वासात न घेतल्यास घरी बसेल. पक्षात नेमकी बदला काय झाला आहे. वेगळी चूल कशासाठी मांडली आहे हे कळतच नाही, असा सवालही मोहिते यांनी उपस्थित केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube