सुपर बाईक्स, अलिशान कार अन्…; भाजपच्या श्रीमंत मंत्र्यानं प्रतिज्ञापत्रकात दाखवलं माफक उत्पन्न
CBDT Verify Rajeev Chandrasekhar’s Poll Affidavit : सुपर बाईक्स, अलिशान कार, रॉयल बंगला, चार्टर्ड प्लेन हे सगळे एकाच व्यक्तीकडे असेल तर आपण समजून जातो की तो एखादा मोठा उद्योगपती असावा, एखादा मोठा बिल्डर असावा किंवा एखादा मोठा जग्गज्जेता खेळाडू असावा. पण या सगळ्या गोष्टी असलेला आणि फक्त समाजसेवा हा व्यवसाय असणारा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. समाजसेवा हा व्यवसाय दाखवून एवढी माया जवळ बाळगणारा हा उमेदवार निवडणूक आयोगाच्याही रडारवर आला आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर आयोगाने या उमेदवाराच्या संपत्तीची आणि प्रतिज्ञापत्राची चौकशीची करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात जर काही काळंबेरं आढळलं तर त्यांची उमेदवारीही रद्द होऊ शकते. नेमके कोण आहेत हे उमेदवार आणि ते का वादात सापडले आहेत? पाहुया सविस्तर…
सत्यजित तांबे यांची संपत्ती माहीत आहे का ? शपथपत्रातून समोर आली माहिती
भारतात राजकारण्यांची संपत्ती हा कायमच चर्चेचा विषय असतो. निवडणूक काळात उमेदवार म्हणून द्याव्या लागणाऱ्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती समोर येते. अशीच माहिती समोर आली आहे ती भाजपचे केरळमधील तिरुवनंतपुरमचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांच्याबद्दल. चंद्रशेखर यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या माहितीवरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानेही ‘केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला म्हणजेच CBDT ला चंद्रशेखर यांच्या प्रतिज्ञापत्रातील तपशीलांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
खरंतर राजीव चंद्रशेखर हे फक्त राजकारणी नाहीत. ते पक्के उद्योगपतीही आहेत. त्यांनी 1994 ‘बीपीएल’ मोबाइल सेवाकंपनी सुरू केली होती. काळाच्या ओघात ती बंद पडली. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी ज्यूपिटर कॅपिटल ही गुंतवणूक कंपनी काढली. एका वृत्तवाहिनीच्या कंपनीमध्ये त्यांनी पैसे गुंतवले होते. मंत्री झाल्यावर बहुधा या कंपनीतून भाजपने त्यांना बाहेर पडण्यास सांगितले असावे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर विषयातील ते जाणकार आहेत.
Election Commission : सुषमा अंधारेंनी निवडणूक आयोगालाही सोडलं नाही
2006 पासून राजीव चंद्रशेखर राज्यसभेत होते. नुकतीच त्यांची खासदारकीची मुदत संपली. आपल्या अठरा वर्षांच्या खासदारकीच्या काळात चंद्रशेखर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते राहिले. एनडीएच्या केरळ गटाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2021 मध्ये त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. यंदा त्यांना बळेबळेच लोकसभेच्या रिंगणात उडी घ्यावी लागली आहे.
असे हरहुन्नरी असलेल्या राजीव चंद्रशेखर यांनी निवडणूक शपथपत्रात आपला व्यवसाय समाजसेवा असा दाखवला आहे. तर संपत्ती 36 कोटींची घोषित केली आहे. शिवाय 2004 मध्ये 10 हजार रुपयांमध्ये विकत घेतलेली रेड इंडियन स्काउट मॉडेल असलेली एक बाईक असल्याचेही त्यांनी दाखवले आहे. पण त्यांचा याच शपथपत्रावर काँग्रेसने आक्षेप घेत त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
राजीव चंद्रशेखर यांनी त्यांचे बाँड, शेअर्स आणि डिबेंचर हे देणे म्हणून दाखवले आहेत. यातून त्यांनी आकड्यांमध्ये फेरफार करून आपली संपत्ती 36 कोटी रुपये दाखवली आहे. शिवाय त्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी नऊ कोटी आणि 13 कोटी रुपयांची आकडेवारी लिहिली आहे. राजीव चंद्रशेखर यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दोन मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही, असेही काँग्रेसने म्हटले आहे. कोरमंगला ब्लॉक 3 मधील निवासी भागात त्यांच्या मालमत्तेची किंमत शेकडो कोटींच्या घरात आहे.
राज्य मागासवर्ग आयोग : शिंदे-फडणवीसांना अडचणीत आणणारे तीन आरोप!
याशिवाय 2005 मध्ये बीपीएल टेलिकॉममधील 64 टक्के शेअर्सच्या विक्रीतून राजीव चंद्रशेखर यांना चार हजार 400 कोटींचा फायदा झाला होता. हा सर्व प्रॉफिट सध्याच्या घडीला मीडिया, संरक्षण, पायाभूत सुविधा, एरोस्पेस, भांडवली बाजार इत्यादींसारख्या विविध व्यवसायांमध्ये अस्तित्त्वात आहे. एवढी कोट्यवधींची माया असताना देखील चंद्रशेखर यांनी 2021-22 मध्ये फक्त रूपये 680 तर, 2022-23 मध्ये 5 लाख 59 हजार 200 चे करपात्र उत्पन्न घोषित केले होते. द मिंटच्या मते, 2018 आणि 2024 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये तपशीलवार प्राप्तिकर परतावा बारकाईने बघितल्यास चंद्रशेखर यांचे उत्पन्न सात आर्थिक वर्षांमध्ये 28 कोटींवरून 5.5 लाखांवर घसरले आहे.
अवनी बन्सल आणि रेंजिथ थॉमस यांनी 2018 मध्ये निवडणूक आयोगाकडे (ECI) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चंद्रशेखर यांनी केवळ 36 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. यामध्ये एकूण 9.25 कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश होता, पण 45 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक यातून वगळण्यात आली होती. तसेच घोषित स्थावर मालमत्तेमध्ये बेंगळुरूमधील कोरमंगला येथील अलिशान बंगल्याचाही समावेश करण्यात आलेला नव्हता. 2020 आणि 2018 मधील तक्रारी निवडणूक प्रतिज्ञापत्रांसह केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे (CBDT) पडताळणीसाठी पाठवत असल्याचे रंजित थॉमस यांना 22 सप्टेंबर 2022 रोजी कळवले होते. परंतु, त्यानंतर या प्रकरणात कोणतीही प्रगती झालेली नाही. आता काँग्रेसने दाखल केलेली तक्रारही ECI ने CBDT कडे पाठवल्याचे सांगितले आहे.
मी वाट पाहतोय! महादेव जानकरांसाठी मोदींचा खास संदेश; फडणवीसांनी जाहीर सभेतच सांगितला
आरोप खरे असतील तर?
प्रतिज्ञापत्रात दिलेली कोणतीही विसंगत किंवा चुकीची माहिती लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 125A अंतर्गत येते. या कायद्यानुसार, प्रतिज्ञापत्रात कोणतीही माहिती लपविल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. काँग्रेसच्या आरोपात तथ्य असल्यास राजीव चंद्रशेखर यांची उमेदवारीही रद्द होऊ शकते. त्यामुळे प्रथमच निवडणूक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळेल आणि आणि शशी थरूर यांना तिरुअनंतपुरममध्ये सहज विजय मिळू शकतो.