ठाकरे गटाचं ठरलं! उद्या करणार उमेदवारांची घोषणा, ‘हे’ 16 उमदेवार फिक्स?

ठाकरे गटाचं ठरलं! उद्या करणार उमेदवारांची घोषणा, ‘हे’ 16 उमदेवार फिक्स?

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) बिगुल वाजले आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सर्व पक्ष काम करत आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi)जागावाटपाचा पेच कायम असतांना भाजपने आपल्या उमदेवारांची घोषणा केली. त्यापाठोपाठ कॉंग्रेसनेही आपल्या उमेदवारांची घोषणा केली. तर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची शिवसेना उद्या (२६ मार्च) आपल्या उमदेवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. तशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली.

उमेदवार देतांना भाजपची दमछाक, विदर्भातील पाचही जागांवर कॉंग्रेसच येणार; वडेट्टीवारांचे टीकास्त्र 

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीला जागावाटपावर अद्याप तोडगा काढता आला नाही. मात्र, आता ठाकरे गट आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार उबाठाच्या पहिल्या यादीत 15 ते 16 उमेदवारांचा समावेश असू शकतो. ठाकरेंची शिवसेना आपल्या पहिल्या यादीत कोणताही वाद नसणाऱ्या मतदारसंघांवर उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ यांचा समावेश असू शकतो.

नगर हादरलं! पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीनं पत्नीसह दोन मुलींना दिलं पेटवून 

यासोबतच विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण मुंबई, सांगली, मावळ या जागांवरही शिवसेना आपले उमेदवार जाहीर करू शकते.

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
1. दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
2. उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर
3. उत्तर पूर्व मुंबई – संजय दिना पाटील
4. दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई
5. रायगड – आनंद गीते
6. रत्नागिरी सिंधुदुर्ग- विनायक राऊत
7. ठाणे- राजन विचारे
8. धाराशिव- ओमराज निंबाळकर
9. परभणी – संजय जाधव
10. सांगली – चंद्रहार पाटील
11. मावळ- संजोग वाघेरे
12. शिर्डी- भाऊसाहेब वाकचोरे
13. बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
14. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
15. छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
16. यवतमाळ वाशीम – संजय देशमुख

आज महाविकास आघाडीची बैठक
दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजता महाविकास आघाडीची आज उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीला मविआचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेना उद्या (२६ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याच्या तयारीत असल्याने या बैठकीला महत्त्व आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube