नगर हादरलं! पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीनं पत्नीसह दोन मुलींना दिलं पेटवून
Ahmednagar Crime : चारित्र्याच्या संशयावरुन नराधम पतीने चक्क आपल्या पत्नीसह दोन मुलांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा (Pimpalgaon landga)येथे घडली आहे. या दुर्घटनेमध्ये लिलाबाई लांडगे, साक्षी लांडगे व खुशी लांडगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजतात तातडीने पोलीस प्रशासनाने (Ahmednagar Police)आरोपी सुनील लांडगे याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने नगर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Government Schemes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, आरोपी सुनील लांडगे (45)नेहमीच आपल्या पत्नीवर संशय घेत असत. आपल्या पत्नीचे इतर पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी घेत असल्याने अनेकदा दोघांमध्ये वाद देखील होत होते. दरम्यान सोमवारी देखील याच कारणावरुन पती-पत्नींमध्ये वाद झाले. वाद टोकाला गेल्याने नराधम पतीने थेट चक्क मुलींसह पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकत त्यांना पेटवून दिले.
ईडीमध्ये अधिकारी होण्याची संधी, महिन्याला 1,51,000 रुपये पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
या घटनेची माहिती समजतात तात्काळ पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमध्ये आईसह दोन्ही मुली चांगल्याच होरपळल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी तात्काळ आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी सुनील लांडगे हा शेती आणि मजुरी करतो. सकाळी त्याने पत्नी व दोन लहान मुलींना घरात कोंडून घेतले. त्यानंतर गावाजवळूनच एका डब्यामध्ये ज्वलनशील पदार्थ आणला. आणि पत्नीसह मुलींच्या अंगावर ते टाकून तिघींनाही पेटवून दिल्याची माहिती समजली आहे.