राहुल गांधींवर बोफोर्सचा आरोप, भरसभेत अजितदादांचं विधान, चूक सावरत म्हणाले, ‘आता बापाचं…’

राहुल गांधींवर बोफोर्सचा आरोप, भरसभेत अजितदादांचं विधान, चूक सावरत म्हणाले, ‘आता बापाचं…’

Ajit Pawar satara Speech : साताऱ्यात महायुतीने उदयनराजे भोसलेंना (Udayanraje Bhosale) उमदेवारी दिली. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे रिंगणात आहे. महायुतीच्या नेत्यांकडून थेट पंतप्रधान मोदींच्या नावावर मत मागितली जात आहे. साताऱ्यातील सभेत बोलतांना अजित पवारांनी (Ajit Pawar) मोदींचं कौतुक करत भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत काम करा आणि महायुतीच्यामेदवाराला विजयी करा, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी दादांकडून बोलण्याच्या ओघात एक चूक झाली. मात्र, त्यांनी लगेच आपली चुक दुरूस्त केली.

भारतात WhatsApp ची मोठी कारवाई, तब्बल 80 लाख अकाऊंट्सवर बंदी, ‘हे’ आहे कारण 

महायुतीचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आज महायुतीची आज साताऱ्यात सभा झाली. या सभेला संबोधित करतांना अजित पवार काँग्रेसच्या काळात पंतप्रधानांवर झालेल्या आरोपांवर बोलत होते. राहुल गांधींवर बोफोर्सचा आरोप झाला, असं ते बोलून गेले. पण तितक्यात कोणीतरी त्यांची चूक लक्षात आणून दिली. अजित पवार यांनी त्याचे आभार मानले. बरं झालं चूक निदर्शनास आणून दिली, नाहीतर तेच दाखवत बसले असते, असं म्हणत टोला अजित पवारांनी माध्यमांवर लगावला.

अजित पवार म्हणाले, मी चुकून राहुल गांधी असं म्हणालो. मला राजीव गांधी म्हणायचं होतं. करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद, असं म्हणत त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं. पुढं बोलतांना ते म्हणाले, ‘बरं झालं तुम्ही चूक लक्षात आणून दिली. नाहीतर तेवढचं दाखवत बसले असते. अजित कसा चूकला? अजित कसा चूकला? त्यांना दुसंर काय कळतंय. ब्रेकिंग न्यूज.. ब्रेकिंग न्यूज.. राजीवजींच्या जागी राहुलचं नाव घेतलं. ठिक आहे नाही. त्यांच्याच पोराचं नाव घेतलं. आधी पोराचं घेतलं ना, आता बापाचं घेतो, अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली.

विजय राजच्या ‘मर्डर इन माहीम’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल? 

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महायुतीचं काम करा आणि उदयनराजेंन निवडून आणा, अशा सूचना दिल्या. तुम्ही बाकीचा काही विचार करू नका… कामाच्या बाबतीत तुम्ही आमच्यावर सोडा,असं अजित पवार म्हणाले.

मी सत्तेसाठी हापापलेला माणूस नाही
मी सत्तेचा हापापलेला माणूस नाही. पण चव्हाण साहेबांचा विचार, चव्हाण साहेबांनी दाखवलेला रस्ता… चव्हाण साहेबांवरही अनेक संकट आली. काही चढउतारही आले. पण, त्यांनी लिहिलंय, बहुजन समाजाला जर तुम्हाला मदत करायची असेल तर सरकारमध्ये जाऊनच मदत करता येते. त्यामुळं चव्हाणांचा संदर्भ घेऊन अजित पवारांनी सत्तेत सहभागी झाल्याचं सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube