लोकसभेसाठी अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मंत्री, माजी मंत्र्यांची भलीमोठी यादी पाहाच

लोकसभेसाठी अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मंत्री, माजी मंत्र्यांची भलीमोठी यादी पाहाच

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठ (Lok Sabha elections) प्रत्येक पक्षाने आपापल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजप-शिवसेनेनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली (S. R. Kohli) यांनी जाहीर केली आहे.

निलेश लंकेंची यांची रोज नवीन गुगली, पवारांशी बोलणे नाही…पण त्यांनाच विचारणार 

या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, कृषी मंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा समावेश आहे.

मंत्री दिलीप वळसे पाटलांचा हात फ्रॅक्चर; पु्ण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू 

याशिवाय, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. के. शर्मा, सय्यद जलालूद्दीन, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार आणि प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी, आमदार सुनिल टिंगरे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार सुनिल शेळके, आमदार विक्रम काळे, आमदार चेतन तुपे, आमदार नितीन पवार, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री आमदार दत्ता भारणे, आमदार सतीश चव्हाण, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी आदींचा समावेश आहे.

दरम्यान, भाजपच्यचा चाळीस जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचाही समावेश करण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या यादीतही अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube