…तर ब्रृजभूषण सिंगचा राजीनामा का घेतला नाही?, कराळे गुरुजींचा मोदींना सवाल

…तर ब्रृजभूषण सिंगचा राजीनामा का घेतला नाही?, कराळे गुरुजींचा मोदींना सवाल

Nitesh Karale on PM Modi : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ आज शरदचंद्र पवार यांची सभा झाली. या सभेला संबोधित करतांना नितेश कराळेंनी (Nitesh Karale) मोदी सरकारवर जोरदार टीका केली. देशातील प्रत्येक महिला मोदींना आईसमान असेल तर कुस्तीपटूंवर अत्याचार करणाऱ्या बृजभूषणचा मोदींनी राजीनामा का घेतला नाही, असा सवाल कराळेंनी केला.

देशात CAA लागू झाल्यानंतरची पहिली मोठी बातमी! 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व 

नितेश कराळे म्हणाले की, मोदींजी आता आपल्या-भाषणात मुलाखतीत सांगतात की, देशातील प्रत्येक महिला मला माझ्या आईसमान आहे. मग मणिपूरच्या महिलांना न्याय का दिला नाही? कुस्तीपटूवर ब्रृजभूषण सिंग यांनी अत्याचार केल्यानं महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केलं. कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण सिंगच्या राजीनाम्याची मागणी केली होती, तेव्हा बृजभूषणचा राजीनामा का घेतला नाही? असा सवाल कराळेंनी केला. महिलांची नग्न धिंड निघू नये, असं वाटत असेल तर मोदींना मतदान देऊ नका, असं आव्हानही कराळेंनी केलं.

‘मला ना घरका ना घाटका करण्याचा प्रयत्न’; ‘त्या’ व्हायरल फोटोवर झिरवळ स्पष्टच बोलले 

उद्योगपतींचे 14 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ…
कराळे म्हणाले, मोदी सांगतात की, ना खाऊंना, ना खाने दुंगा. मात्र, मोदींनी उद्योगपतींचे 14 लाख करोड रुपयांची कर्जमाफी केली. मात्र, शेतकऱ्यांचे दीड लाख करोड रुपये माफ करू शकले नाही, मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आहे. गुजरातचे कांदा निर्यात होतो, पण महाराष्ट्राचा कांदा निर्यात होत नाही, मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत की, गुजरातचे पंतप्रधान आहेत, असा सवाल कराळेंनी केला.

मोदींनी दोन कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं. ते आश्वासनही मोदीजी पूर्ण करू शकलं नाही. या सरकारने अग्निवीर योजना आणली. या योजनेअंतर्गत सैन्यात जाणारा युवक लग्नाच्या वयात रिटायर्ड होणार आहे. लग्नाच्या वयात पोरांना रिटायर्ड करणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत, अशी टीका कराळेंनी केली.

मोदीजी थापा मारण्याशिवाय काहीच करत नाहीत. 2014 मध्ये त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर मते मागून सत्ता मिळवली. दहा वर्षांनंतर महागाईची स्थिती काय आहे? महागाई पाहता आता मोदी सरकारला हटवण्याची वेळ आली आहे. कारण हा दाढीवाला जर सत्तेत आला तर डीएपची बॅग व पेट्रोल डिझेल 400 रुपयांच्या पुढे जाईल, असंही कराळे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज