माढ्यात राजकीय हालचालींना वेग, अनिकेत देशमुखांनी घेतली पवारांची भेट
Dr. Aniket Deshmukh Met Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, मविआचा (Mahavikas Aghadi) माढा लोकसभेच्या (Madha Lok Sabha) उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नाही. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite) यांनी अलीकडेच शरद पवारांची भेट घेऊन माढ्याच्या उमेदवारीबाबत चर्चा केली. त्यानंतर आता माढा लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले डॉ. अनिकेत देशमुखांनी (Dr. Aniket Deshmukh)पवारांची भेट घेतली.
Sunder Kokanraj Song : गारवा फेम गायक मिलिंद इंगळेचं नवं गाणं पाहिलंत?
माढ्यातून लढण्यासाठी भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते. त्यांनी आपली इच्छा जाहीरपणे व्यक्तही केली होती. मात्र, भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहेत. मविआत माढ्याची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली असून शरद पवार गटाने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटलांना शरद पवारांची भेट घेतली होती. ते शरद पवार गटासोबत जातील अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली.
Anil Desai : बाळासाहेबांची आठवण सांगताना अनिल देसाईं भावूक, अश्रू अनावर…
धैर्यशील मोहिते-पाटील पक्षांतर करून तुतारी हाती घेणार का? याबातबत अद्यापही स्पष्टता नसल्यानं माढ्यासाठी धनगर समाजातील व मागील वेळी सांगोला विधानसभआ लढवलेले अनिकेत देशमुख इच्छूक आहेत. काल (ता. 7) डॉ.अनिकेत देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेऊन माढा विधानसभा मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा केली. शरद पवार गटात अद्याप कोणीही प्रवेश केलेला नाही. त्यामुळं अनिकेत देशमुखांना माढ्यातून उमेदवारी मागितली.
मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यामुळेच मी शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केल्याचे अनिकेत देशमुख यांनी सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघात सध्या रणजितसिंह निंबाळकर यांच्याविरोधात रोष आहे. तर मविआला चांगलं वातावरण आहे. येत्या दोन-तीन दिवसांत उमेदवारीबाबत निर्णय घेऊ, असं साहेबांनी सांगितल्याचं देशमुख म्हणाले.
दरम्यान, शरद पवार गटाकडून अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्यानं आता कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.