Video : ” सोबत या सगळी स्वप्न पूर्ण होतील”; नंदुरबारमधून मोदींची ठाकरे-पवारांना मोठी ऑफर

  • Written By: Published:
Video : ” सोबत या सगळी स्वप्न पूर्ण होतील”; नंदुरबारमधून मोदींची ठाकरे-पवारांना मोठी ऑफर

नंदुरबार : एकीकडे नरेंद्र मोदी (Narendra Modi) शरद  पवारांवर आणि उद्धव ठाकरेंवर प्रचारसभांमधून टीकेची झोड उठवत असल्याने राजकारण तापले आहे. या तापलेल्या वातावरणातच आता मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना (Sharad Pawar) मोठी ऑफर दिली आहे. “बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. त्यांनी नकली शिवसेना, NCP ने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन बनवलय” असं मोदी म्हणाले. मात्र, ही टीका करताना मोदींनी पवार आणि ठाकरेंना एक मोठी ऑफर दिली आहे. पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील” असं म्हटले आहे. त्यामुळे आता मोदींच्या या ऑफरवर शरद पवार या उत्तर देतात हे पाहणे महत्ताचे ठरणार आहे. ते नंदुरबारमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलत होते. (Narendra Modi Offer To Shard Pawar)

Video : महाराष्ट्रातून पाठ फिरत नाही तोच, मोदींच्या ऑफरवर पवारांचा कारणासह पूर्णविराम

ठाकरेंना पुन्हा केलं टार्गेट

नुकतीच मोदींनी ठाकरे गटावर टीका करत त्यांना नकळी शिवसेना अशी जिव्हारी लागणारी टीका केली होती. तर, पवारांना पुण्यातील सभेत ‘भटकती आत्मा’ असे संबोधले होते. त्यानंतर चहुबाजुंनी मोदींना टीकाचा सामना करावा लागत असून, या टीकेवरून वातावरण शांत होत नाही तोच मोदींनी आज आता पुन्हा नंदुरबारच्या सभेतून ठाकरेंना टार्गेट केले आहे. ते म्हणाले की. नकली शिवेसना मला गाडण्याची भाषा करत आहे. बाळासाहेब ठाकरेंना मी जवळून पाहिलं आहे. बाळासाहेबांना आज किती दु:ख होत असेल” अशा शब्दात मोदींनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मोठी बातमी : तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर खून खटल्याचा फैसला; दोघांना जन्मठेप तर, तिघे निर्दोष

विकासाच्या बाबतीच माझ्या स्पर्धा करू शकत नसल्यानेच…

शरद पवारांना एकत्र येण्याची मोठी ऑफर दिल्यानंतर आणि ठाकरेंना टार्गेट केल्यानंतर मोदींनी त्यांचा मोर्चा काँग्रेसकडे वळवला. काँग्रेसवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, विकासाच्या बाबतीत काँग्रेस माझ्याची स्पर्धा करू शकत नसल्यानेत त्यांनी प्रचारात खोटं बोलण्याचा कारखाना सुरू केल्याचे म्हटले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज