लोकसभेच्या रणसंग्रामात उद्धव ठाकरेचं ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरतील; परभणीच्या उमेदवारानं सांगून टाकलं
Sanjay Jadhav on Loksabha Election : भाजपने (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) 400 पारचा नार दिला होता. तर राज्यात महायुतीनेही 45 पारचा नारा दिला होता. आता निडणुका पार पडल्या असून कुणाला किती जागा मिळणार? याचे दावे राजकीय नेते करत आहे. आता ठाकरे गटाचे परभणीचे उमदेवार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनीही असाच दावा केला. राज्यात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील आणि त्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मॅन ऑफ द सिरीज ठरतील, असं जाधव म्हणाले.
मराठा-ओबीसी वादाला भाजप जबाबदार, मराठ्यांनी आरक्षण मागितलं तर पोटात…; संजय जाधव कडाडले
संजय जाधव यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने बोलतांना जाधव म्हणाले की, राज्यातील सगळ्या लोकसभा मतदारसंघांचा मी आढावा घेतला तेव्हा यावेळची लढाई ही उद्धव ठाकरे विरुद्ध महायुती अशी होती. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते असतील त्यांनी ज्या रितीने महाविकास आघाडी म्हणून प्रचार केला. तो पाहता उद्याच्या 4 तारखेला या निकालाचा मॅन ऑफ द सिरिज कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. महायुतीच्या किती जागा येतील हे माहिती नाही. पण महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकेल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
Pune Car Accident : ब्लड सॅम्पल बदलणं भोवलं! दोन डॉक्टर अन् शिपायाचं निलंबन…
पोटात दुखायचं कारण काय?
मराठा आरक्षणावरून त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं समर्थन केलं. ते म्हणाले, आजपर्यंत ओबीसींसाठी छगन भुजबळ, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेकांनी लढा दिला आहे. सगळ्या समाजांनी रस्त्यावर उतरून सरकारवर दबाव आणला आणि काही मागण्या मान्य केल्या. आता मराठा समाजाच्या नेत्यांनीही तसाच प्रयत्न केला तर पोटात दुखायचं कारण काय? असा सवाल जाधव यांनी केला.
तुमचा डीएनए ओबीसींचा आहे म्हणून तुम्ही आरक्षणाची मागणी मान्य करत नाही का? असा थेट सवाल जाधव यांनी राज्यातील महायुती सरकारला विचारला. मराठा समाजात आज चूल पेटायचे वांदे आहेत, असंही जाधव म्हणाले.