नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले, नुसता पैशांचा पाऊस…; राऊतांकडून CM शिंदेंचा व्हिडिओ ट्वीट
Sanjay Raut On Eknath Shinde : राज्यातील विविध भागात भाजपचे (BJP) स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच पैसे वाटल्याचा संशय व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या २ तासांच्या दौऱ्यासाठी जड बॅगा आणल्या आहेत. त्यामुळे या बॅगातून कोणता माल नाशिकला पोहोचला? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
मतदार ताटकळले! अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिगाड, निवडणूक कर्मचाऱ्यांची धावपळ
संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला. हा व्हिडिओ नाशिकमधील आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना दिसत आहेत. संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, नाशिकमध्ये रात्रीचे खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचवला? निवडणूक आयोग फालूत नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
तुम्हाला सुपारी माझ्या नावाची मिळणं हा माझा विजय…; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना चिमटा
राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर केलेल्या या आरोपावर आता सत्ताधारी नेते काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.
मुख्यमंत्री खाऊ घेऊनआलेतोक्षण!
नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…
दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत?
यातून कोणतामाल नासिकला पोहचला?
निवडणूकआयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करत आहे.महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरुआहे.
@ECISVEEP pic.twitter.com/2gOaPxVeZm— Sanjay Raut (@rautsanjay61) May 13, 2024
व्हिडिओमध्ये काय आहे?
या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरताना दिसत आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून बाहेर आले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या अंगरक्षकांचा ताफा आहे. या ताफ्यात दोन अंगरक्षकांच्या हातात सुटकेस आणि बॅग दिसत आहे. या पिशव्यांमध्ये नेमके काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, दोन तासांच्या नाशिक दौऱ्यासाठी मुख्यमंत्री इतक्या बॅगा का घेऊन आले, असा सवाल करत संजय राऊत यांनी पैसे वाटपाची शंका उपस्थित केली.
दोनच दिवसांपूर्वी संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेवटची फडफड सुरू असल्याची टीका केली होती. तसंच देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चे मडके असल्याची टीका केली होती. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टेम्पो भरून पैसे आणून दिले तरी काही होणार नाही. अजित पवारांच्या उमेदवारांची निवडणूक संपली असल्याने ते आता मोकळे झाले आहेत. मात्र शिंदे यांची फडफड सुरूच आहे,असं राऊत म्हणाले होते.