ठाणे नरेश महस्केंसाठी टफ? भाजप पदाधिकाऱ्यांकडून राजीनाम्याचे हत्यार, मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

ठाणे नरेश महस्केंसाठी टफ? भाजप पदाधिकाऱ्यांकडून राजीनाम्याचे हत्यार, मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Thane Lok Sabha Election : ठाणे लोकसभेची (Thane Lok Sabha) जागा शिंदे गटाला दिल्याने ठाणे भाजपमध्ये (BJP) नाराजी पसरली आहे. माहितीनुसार, नवी मुंबईतील भाजपच्या 65 माजी नगरसेवकांनी आपले राजीनामे दिले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कल्याण लोकसभेची (Kalyan Lok Sabha) जागा सेफ करण्यासाठी ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली असल्याचा आरोप आता भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. यामुळे नरेश म्हस्के यांच्यासाठी ही निवडणूक टफ जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपच्या तब्बल 539 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. या मतदारसंघातून भाजप आमदार गणेश नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत होते यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आमदार गणेश नाईक या मतदारसंघात नागरिकांशी भेटी- गाठी करत होते. मात्र या मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आल्याने आता अनेक भाजप कार्यकर्ते राजीनामे देत आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील भाजप पदाधिकारी आरोप करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभेची जागा सेफ करण्यासाठी ठाण्यामध्ये किरकोळ उमेदवार दिल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

एकत्र मिळून तोडगा काढू, कमिन्सच्या कामगारांना सुनेत्रा पवारांचा शब्द

कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात किरकोळ उमेदवार देण्यात आला आहे यामुळे याची परतफेड करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. यामुळे या मतदारसंघात आता भाजप शिंदे गटाची साथ सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube