महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्यात कुठे होणार मतदान अन् किती उमेदवार आहेत रिंगणात; वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्यात कुठे होणार मतदान अन् किती उमेदवार आहेत रिंगणात; वाचा सविस्तर

Third phase of Lok Sabha polls : महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात 2024 लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा 7 मे 2024 रोजी होणार आहे. या कालावधीत 11 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात सर्व मिळून 258 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. दरम्यान, सर्वांच्या नजरा बारामतीच्या जागेकडे आहेत. या जागेवर पवार विरुद्ध पवार यांच्यातच लढत होत आहे.

 

Lok Sabha Election साठी ओवेसींविरुद्ध कोट्यवधींची मालकीन मैदानात; माधवी लता हैदराबादचा गड भेदणार?

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 जागांवर मतदान

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांवर 7 मे रोजी मतदान होणार आहे.

 

Lok Sabha Election : भाऊसाहेब वाकचौरेविरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे; शिर्डीतही राजकीय खेळी

कुणची कुणाबरोबर लढत आहे?

  • 1- बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (NCP शरद पवार गट) सुनेत्रा पवार (NCP अजित पवार गट) विरुद्ध लढत होत आहेत.

    २- माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप) धैर्यशील मोहिते-पाटील (राष्ट्रवादी) यांच्यामध्ये लढत होत आहे.

  • 3- उस्मानाबाद मतदारसंघात अर्चना पाटील (महायुती) यांचा सामना ओमप्रकाश राजे निंबाळकर (शिवसेना) यांच्याशी लढत होत आहे.

    4- लातूर मतदारसंघातून सुधाकर श्रृंगारे (भाजप) शिवाजीराव काळगे (काँग्रेस) यांच्या लढत होत आहे.

    5- हातकणंगले जागेवर राजू शेट्टी (स्वाभिमानी पक्ष), सत्यजित पाटील (शिवसेना, उबाठा) आणि धैर्यशील माने (शिवसेना) यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

  • 6- कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज (काँग्रेस) आणि संजय मंडलिक (शिवसेना) यांच्यात थेट लढत होत आहे.

    7- सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे (काँग्रेस) आणि राम सातपुते (भाजप) यांच्यात लढत आहे.

    8- सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील (शिवसेना) संजयकाका पाटील (भाजप) आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत आहे.

    9- सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले (भाजप) यांचा सामना शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी) यांच्याशी होणार आहे.

    10- रायगडमध्ये सुनील तटकरे (राष्ट्रवादी) यांची अनंत गीते (शिवसेना) यांच्याशी लढत आहे.

    11- रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर नारायण राणे (भाजप) आणि विनायक राऊत (शिवसेना, उबाठा) यांच्यात लढत आहे.

 

कुठे किती उमेदवार

पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये सर्वाधिक 38, माढा (32), उस्मानाबाद (31), लातूर (28), हातकणंगले (27), कोल्हापूर (23), सोलापूर (21), सांगली (20) सातारा (१६), रायगड (१३) आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग (९) असे उमेदवार रिंगणात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube