सीमेवर रक्ताची नदी वाहू दे, आम्ही क्रिकेट खेळणारच; संजय राऊतांचा मोदी सरकारवर थेट वार

पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले.

  • Written By: Published:
Sanjay Rraut

आज भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आशिया कप 2025 च्या (Asia Cup) अंतिम सामन्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.
पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 महिलांचे कुंकू पुसले, त्यानंतर आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवले. सीमेवर रक्ताची नदी वाहू देत, पण आम्ही क्रिकेट खेळू आणि पैसा कमवू. आता राष्ट्रवाद कुठे गेला? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

हा सामना काही मोठा नाही, पण या वातावरणात भारत-पाक सामना खेळणे ही अत्यंत घृणास्पद बाब आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाने सुरुवातीपासूनच पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळण्याला विरोध केला आहे.

Asia Cup Final: टीम इंडियाचं कमबॅक; पाकिस्तानला तिसरा झटका, मोहम्मद हारीस झिरोवर आऊट

संजय राऊत यांनी उरी, पुलवामा आणि पहलगावमधील दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत म्हटले की, “या दहशतवादी हल्ल्यांमध्ये निरपराध लोकांचा बळी गेला. 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले. तरीसुद्धा जर आपण पाकिस्तानसोबत सामना खेळणार असू, तर राष्ट्रवाद कुठे गेला? भाजपचे हिंदुत्व कुठे गेले? राष्ट्रभक्ती कुठे गेली? हे सगळं खोटं आहे.

संजय राऊत म्हणाले की, जर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो नाही, तर काहीही होणार नाही. पण इथे सट्टा आणि कमाईच्या पैशाचा मोठा खेळ आहे. BCCI आणि PCB या दोघांनाही यापासून मोठा पैसा मिळतो. मग सीमेवर रक्त वाहो, आपण क्रिकेट खेळणार आणि पैसा कमावणार. मात्र या वेळी देशाची भावना प्रखर आहे. लोक टीव्हीवरदेखील हा सामना पाहू इच्छित नाहीत.

follow us