नवीन सर्व्हे भुमरेंना धक्का देणारा; आमदारकीचा षटकार हुकण्याची चिन्हे

नवीन सर्व्हे भुमरेंना धक्का देणारा; आमदारकीचा षटकार हुकण्याची चिन्हे

News Area India Survey Maharashtra :  न्यूज एरेना इंडिया या संस्थेने  सर्व्हे केला असून राज्यात 2024च्या विधानसभेत भाजपला बहुमत दाखवले आहे. या कंपनीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. याच कंपनीने आता महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. राज्यातील आगामी 2024 च्या विधानसभा दृष्टीने अनेक अंदाज वर्तवले जात आहे. या अगोदर सकाळ वृत्त समूह आणि झी वृत्त समूह यांनी एक सर्व्हे प्रदर्शित केला होता.  न्यूज एरेना इंडियाच्या सर्व्हेमध्ये भाजपला राज्यभरात 123 ते 129 सीट, शिवसेनेला 25 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 50-56 जागा, काँग्रेसला 50-53 जागा, ठाकरे गटाला 17-19 जागा आणि अन्य 12 असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीगनर सर्व्हे

तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भाजपला 3 जागा, शिवसेनेला 3 जागा, राष्ट्रवादीला 1 जागा, ठाकरे गटाला 1 जागा आणि बीआरएसला 1 जागा दाखवण्यात आली आहे. यामध्ये फुलंब्री, गंगापूर आणि औरंगाबाद पूर्व याठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होताना दाखवले आहे. तर सिल्लोड, वैजापूर आणि औरंगाबाद पश्चिम याठिकाणी शिवसेनेचा विजय दाखवला आहे. तसेच औरंगाबाद मध्य या जागेवर राष्ट्रवादी व पैठणची जागा ठाकरे गटाला दाखवली आहे. यासह कन्नडची जागा बीआरएसला दाखवली आहे.

https://letsupp.com/maharashtra/according-to-news-arena-india-survey-bjp-will-be-the-largest-party-with-123-129-seats-in-the-assembly-elections-59158.html

कुणाला बसणार फटका

या सर्व्हेनुसार शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेनेचे  संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे हे पाच आमदार आहे. तर ठाकरे गटाचे  उदयसिंह रजपूत हे एकमेव आमदार जिल्ह्यात आहे. या सर्व्हेनुसार सध्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे व प्रदीप जैस्वाल यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. संदीपान भुमरे हे कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाचा आमदार निवडून येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद मध्य या जागेवर प्रदीप जैस्वाल यांच्याऐवजी राष्ट्रवादीचा आमदार व कन्नडचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह रजपूत यांच्याऐवजी बीआरएसला ही जागा दाखवण्यात आली आहे.

Aurangabad – BJP : 3, SS : 3, NCP : 1, SSUBT : 1, OTH : 1 

Sillod : SS , Kannad : BRS , Phulambri : BJP , Aurangabad Central : NCP , Aurangabad West (SS) , Aurangabad East : BJP , Paithan : SSUBT , Gangapur : BJP , Vaijapur : SS

दोन सर्व्हेमध्ये पिछाडीवरील फडणवीस आले आघाडीवर; भाजप स्वबळावर गाठणार सव्वाशेचा आकडा

सध्याची परिस्थिती काय 

सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे हे पाच आमदार आहे. भाजपचे अतुल सावे, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब हे तीन आमदार  असून या तिनही जागेवर भाजप रिपीट होताना दिसत आहे.  तर ठाकरे गटाचे उदयसिंह रजपूत हे आमदार आहे. या सर्व्हेनुसार शिवसेनेला आपल्या दोन जागा गमवाव्या लागणार असल्याचे दिसत आहे. तर ठाकरे गटाला कन्नडच्याऐवजी पैठणची जागा दाखवण्यात आली आहे. यासह भाजप आपल्या तीनही जागा रिपीट करताना दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube