लालसेपोटी बाळासाहेबांच्या विचाराचा त्याग केला, एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला

  • Written By: Published:
लालसेपोटी बाळासाहेबांच्या विचाराचा त्याग केला, एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला

श्रीनगर मध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या 11 राज्य प्रमुखांची बैठक होत आहे. जेव्हापासून राज्यात भाजप – शिवसेना युतीचे सरकार आले तेव्हापासून 23 राज्यातील प्रमुखांची बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या शिवसेनेला समर्थन दिले. काही लोकांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी बाळासाहेबांच्या विचाराचा त्याग केला. आणि जन्मभर ज्यांचा विरोधकेला त्यांच्या सोबत गेले. असा टोला एकनाथ शिंदेनी (Eknatha Shinde) उद्धव ठाकरेंना ( Udhav Thackeray) लगावला ते आज जम्मू – काश्मीरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. Abandoned Balasaheb’s thought out of greed, Eknath Shinde’s taunt to Udhav Thackeray)

परंतु आम्ही राज्यात बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसेना – भाजप युतीचे सरकार स्थापन केले. जेव्हा काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार बनवली तेव्हा पासून महाराष्ट्रातील जनता आणि बाळासाहेबांच्या विचाराचे आमदार देखील नाराज होते. म्हणून आम्ही सर्व जण या सरकारमधून बाहेर पडलो आणि भाजपसोबत सरकार बनवले.

पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष बाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले उद्धव ठाकरेंनी जे केलं तेच शरद पवारांनी केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पण आणि मुलगा केबिनेट मंत्री देखील. तसेच शरद पवारांनी संख्या पुतण्याचा पत्ता कट करत पक्ष मुलीच्या हातात दिला.

पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज… औरंग्या नक्की कोणाच्या अंगात संचारला, विरोधकांचा सवाल

श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, या दरम्यान त्यांनी श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली आणि त्यावेळी महाराष्ट्र भवनासाठी श्रीनगरमध्ये जागा मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (11 जून) श्रीनगरमध्ये उपराज्यपाल मनोज सिन्हा (J&K LG Manoj Sinha ) यांची शिष्टाचार भेट घेतली, त्यांची प्रत्यक्ष भेट घऊन मुख्यमंत्री शिंदेंनी महाराष्ट्र भवनासाठी जागेची विनंती केली. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जम्म-काश्मीरला येत असतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट भवन हा पर्याय असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube