अजित पवारांकडे जाण्यासाठी दबाव, मी आत्महत्याच…, स्वगृही परतलेल्या अभिजीत पवारांचे गंभीर आरोप

अजित पवारांकडे जाण्यासाठी दबाव, मी आत्महत्याच…, स्वगृही परतलेल्या अभिजीत पवारांचे गंभीर आरोप

Abhijit Pawar Serious Allegation on Ajit Pawar after return : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांनी अजित पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर लगेचच दोन दिवसात त्यांनी पुन्हा माघार घेत स्वगृही परतले आहेत. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अभिजीत पवार यांच्यासह पत्रकार परिषद घेत अभिजीत यांच्या प्रवेशा मागची कारण सांगत गंभीर आरोप केले आहेत.

आम्ही छाताडावर बसून एकरकमी एफआरपी घेतली, राजू शेट्टी न्यायालयातच संतापले !

यावेळी बोलताना अभिजित पवार म्हणाले की अजित पवार यांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव टाकला गेला. तसेच जितेंद्र आव्हाडांना अडकवण्यासाठी माझा वापर केला जात होता. मात्र आव्हाड यांचा फोन आला नसता तर मी 22 फेब्रुवारीला आत्महत्या करणार होतो. आव्हाड हेच माझे नेते आहेत आणि त्यांची साथ मी कधीही सोडणार नाही. असं म्हणत अभिजीत पवार यांनी स्वगृही परतल्यानंतर अजित पवार गटावर गंभीर असे आरोप केले आहेत.

भारताची धमाकेदार सुरुवात, शामी, गिल चमकले, बांग्लादेशचा 6 विकेटने पराभव

यावेळी बोलताना अव्हाड म्हणाले की, अभिजीत पवार मला पहिल्यांदाच घाबरलेला दिसला. त्याच्या बाबतीत जे झालं ते वाईट झालं. अशाच प्रकारे आमच्या पक्षाचा मुंब्रातील अध्यक्ष शमीन खानलाही गेल्या वर्षभर असाच त्रास दिला जातोय. आयकर अधिकाऱ्यांची फोन येतात. दुबईवरून धमक्या येतात. त्यात जमील शेखचा खून झाला आहे. तर शमीन खान देखील आत्महत्येकडे वळाला होता. त्यामुळे राज्यात हे असे प्रकार कधी थांबणार आहे? असं सवाल त्यांनी विचारला.

त्याचबरोबर या सर्व प्रकारासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांना सांगणार आहे. नुकतेच ते म्हटले होते की, विरोधकांकडून संवाद कमी होतोय. मात्र आम्ही अशा वातावरणामुळे बोलायला घाबरतो. तसेच अजित पवार यांना मला अडकवायचे आहे. मात्र मी कुठल्याही गुन्ह्यांमध्ये सापडत नाही. तसेच माझे संपत्तीची खोली चौकशी करा. असा थेट आव्हान देखील यावेळी त्यांनी केले. तसेच यावेळी अजित पवारांवर बोलताना आव्हाड म्हणाले की, अजित पवार यांनी आता तरी डोळे उघडावेत. लोकांना घाबरून धमकावून स्वतःच्या गटात घेण्याचं घाणेरड राजकारण ठाणे शहरात केले जात आहे. असंही आव्हाड म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube