अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Ahilyanagar Municipal Corporation राज्य निवडणूक आयोगाने अहिल्यानगर प्रभाग आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Ahilyanagar Municipal Corporation

Ahilyanagar Municipal Corporation Election Reservation Draw Program Announced : राज्यामध्ये सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कमाची लगबग सुरू झाली आहे. त्यामध्ये निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यात आता राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर होऊन त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आता राज्य निवडणूक आयोगाने अहिल्यानगर प्रभाग आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

वाळू माफियाराज संपणार? राज्यात बांधकामांसाठी एम सँड वापराचा शासन आदेश जारी

त्यानुसार 8 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध होऊन 11 नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

पश्चिम तुर्की हादरलं! 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने इमारती कोसळल्या

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

1) आरक्षित जागांची संख्या निश्चित करुन त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करणे – 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर
2) आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे – 8 नोव्हेंबर
3) आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे – 11 नोव्हेंबर
4) प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिध्द करणे – 17 नोव्हेंबर
5) प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याचा अंतिम दिनांक – 24 नोव्हेंबर
6) प्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करुन महानगरपालिका आयुक्त यांनी निर्णय घेणे – 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर
7) आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करणे – 2 डिसेंबर

follow us