भिंगारकरांचं स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर! कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर महापालिकेत जाणार?

भिंगारकरांचं स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर! कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर महापालिकेत जाणार?

अहमदनगर : अहमदनगरमधील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड अहमदनगर महापालिकेत जाणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. राज्य सरकारने राज्यातील एकूण सात कॅन्टोन्मेंट बोर्डांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीच्या माहितीचा अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडून अहमदनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद व नागपूर येथील महापालिका आयुक्तांना आज आदेश देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार भिंगार येथील अहमदनगर छावणी परिषदेचे अहमदनगर महापालिकेत विलिनीकरण करता येईल का? विलिनीकरण केल्यास महापालिकेची प्रभाग रचना, लोकसंख्या आदीबाबींत काय बदल होतील.

जगण्याची इच्छा नसल्याचे पत्र टाकून पोलिस कर्मचारी गायब…

या संदर्भातील सविस्तर अहवाल राज्य सरकारने अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना मागितला आहे. त्यामुळे भिंगार शहर अहमदनगर महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता वाढली आहे.

राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डांचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर राज्य सरकारकडून यासंदर्भात हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक इथल्या कॅन्टोन्मेंंट हद्दीतील अहवाल अद्याप राज्य सरकारकडे दाखल झाले नसून हा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देश तुमच्या बापाचा माल आहे का? निलेश राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

या अहवालामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाची हद्द, लोकसंख्या, त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट हद्द महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेची हद्द आणइ लोकसंख्या किती होईल? याबाबतची माहिती अहवालामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे राज्य सरकारने मागितली आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून देशातल्या 56 कॅन्टोन्मेंट बोर्डा्च्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. येत्या 30 एप्रिल रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी मतदान पार पडणार होतं. यामध्ये पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर कॅन्टोन्मेंट बोर्डाचाही समावेश होता.

Maharashtra Politics : ‘अमृता फडणवीस प्रकरणावर बोलू नका’, शरद पवारांचे थेट आदेश

मात्र, 17 मार्च रोजी अचानक निवडणुका रद्द करण्यात आल्याची अधिसूचना संरक्षण खात्याकडून जाहीर करण्यात आली होती. एकीकडे निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार सुरु होती. तर दुसरीकडे अचानक निवडणुका रद्द झाल्याने इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला.

निवडणुका रद्द झाल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाचा महापालिकेत समावेश होणार असल्याच्या कारणानेच रद्द झाल्याचा सून नागिरकांमध्ये सुरु होता. अखेर कॅन्टो्न्मेंट बोर्डाचा महापालिकामध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube