‘कृपया, अशा विषयांना तरी सोडा!’ मुली बेपत्ता होण्यावरुन आजी-माजी अध्यक्षांत जुंपली

‘कृपया, अशा विषयांना तरी सोडा!’ मुली बेपत्ता होण्यावरुन आजी-माजी अध्यक्षांत जुंपली

Vijaya Rahatkar on Rupali Chakarankar and Supriya Sule : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का? असा सवाल करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (State Commission for Women Chairperson) रुपाली चाकणकर (Rupali Chakarankar) यांनी शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार हल्लाबोल केला होता. यामध्ये राज्यातील महिला बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आकडेवारी त्यांनी जाहीर केली होती. त्यांच्या या दाव्याला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विजया रहाटकर यांनी रुपाली चाकणकर आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उत्तर देत म्हटले की महाराष्ट्र असो की अन्य कुठले राज्य, मुली-महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत असेल तर ते चिंताजनकच आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व त्यांच्याच गोटातील काही मंडळींनी अशा थाटात हा विषय मांडला, की जणू काही राज्य सरकार बदलले आणि मुली बेपत्ता व्हायला लागल्या!

त्यांनी पुढं म्हटले की अति काळजीचा आणण्यापूर्वी मुख्य विषय समजून घ्या. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 4000 मुली आणि 64,000 महिला बेपत्ता होतात. अगदी महाविकास आघाडीचे सरकार असले तरीही…

2020 मध्ये 4517 मुली आणि 63,252 महिला बेपत्ता झाल्या.
2021 मध्ये 3937 मुली आणि 60,435 महिला बेपत्ता झाल्या.

आता दुसरे महत्त्वाचे म्हणजे मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात सरासरी 90 टक्के प्रकरणात डिटेक्शन होते, तर महिलांच्या बाबतीत 75 टक्के तपास पूर्ण होतो, म्हणजे त्या सुखरूप परत आणल्या जातात, असे विजया रहाटकर यांनी सांगितले.

Rupali Chakankar : धक्कादायक! राज्यात मुली सुरक्षित नाहीत, दररोज 70 मुली होतात बेपत्ता

त्या पुढं म्हणाल्या की तुलनाच करायची झाली तर पश्चिम बंगाल, बिहार, दिल्लीत हे प्रमाण मुलींच्या बाबतीत वर्षाला सरासरी 12 हजारावर, तर महिलांच्या बाबतीत 64 हजारावर आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक अल्पवयीन मुलीच्या बाबतीत एफआयआर दाखल केला जातो.

boat Accident : केरळमध्ये भयावह दुर्घटना, पर्यटकांची नाव उलटून 21 जणांचा मृत्यू

निश्चितच ही समस्या गंभीर आहे. राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवून यावर उपाय सुचविले पाहिजेत. केवळ टीकेसाठी टीका करुन प्रश्न सुटत नसतात. आरोप प्रत्यारोप करण्यासाठी राजकारणात वारेमाप संधी असते. कृपया, अशा विषयांना तरी सोडा!, असे आवाहन विजया रहाटकर यांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube