Rajaram Sugar Mill : राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिकांची निवड

Rajaram Sugar Mill : राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिकांची निवड

Rajaram Co-Operative  Sugar Mill :  कोल्हापूरच्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या नवीन अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. ही निवडणुक सतेज पाटील विरुद्ध महाडिक अशी गाजली होती. यानंतर आता अमल महाडिक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

आज या साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक झाली. या बैठकीतून नुतन अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची निवड करण्यात आली. राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी अमल महाडिक हे प्रबळ दावेदार मानले जाते होते. मात्र, त्यांच्या जागी नवीन चेहऱ्याला संधी देणार का, याचीही चर्चा केली जात होती.

सुषमा अंधारेंचं भाकीत एकनाथ शिंदेंची झोप उडविणारे…भाजप काही तासांतच दुसरा सीएम नेमणार!

दरम्यान, राजाराम कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी महाडिकांच्या विरुद्ध जोरदार प्रचार केला होता. या अगोदर बंटी पाटील यांनी गोकुळ मधील महाडिकांची सत्ता उलथवून लावली होती. तसेच विधानसभेला बंटी पाटील यांचे पुतणे ऋतूराज पाटील यांनी अमल माहडिक यांचा पराभव केला होता. त्यामुळे ही निवडणुक अत्यंत चुरशीची मानली जात होती.

कांताबाई अंधारे कसदार जमीन अन् मी दमदार पीक, सुषमा अंधारेंना अश्रू अनावर

पण या निवडणुकीत महाडिक गटाने सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवला. गेल्या 28 वर्षांपासून महाडिकांची कारखान्यावर सत्ता होती. या निवडणुकीत बंटी पाटील यांनी कंडका पाडायचा, अशी टॅगलाईन वापरली होती. परंतु निवडणुकीत तुमचाच कंडका पडलाय, असा टोला महाडिकांकडून त्यांना लावण्यात आला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube