सर्वात मोठी बातमी ! अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार

Ambadas Danve : महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 

Ambadas Danve

Ambadas Danve : महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीकडून या जागेसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत असल्याची देखील माहिती समोर आली होती. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी  मोठी घोषणा करत अंबादास दानवे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार असल्याची माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरे यांच्याकडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता काँग्रेस (Congress) आणि शरदचंद्र पवार पक्षाला (NCPSP) अंबादास दानवे यांची उमेदवारी मंजूर असणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून उद्या 11 वाजता दानवे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 एप्रिल शेवटचा दिवस आहे.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशावरुन शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे असं माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले. तर अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून देखील देण्यात आली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर ही माहिती देत अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे (MVA) विधान परिषदेचे उमेदवार असतील उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली असल्याची माहिती दिली आहे.

विधान परिषदेसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर; EVMs वर टेप प्रकरणात फेरमतदानाचे आदेश-

 

follow us