दमानियांची चार वाजता पत्रकार परिषद; अजितदादांचा ‘गुलाबी’ ताफा टार्गेटवर
मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात मोर्चा उघडला असून, आज (दि.17) दुपारी चार वाजता अजित पवारांबद्दल मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे दमानियांनी यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टवर नमुद केले आहे. त्यामुळे आता दमानिया पत्रकार परिषदेत नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे राष्ट्रवादी पक्षासह महायुतीचे पण लक्ष लागले आहे. (Anjali Damania On Ajit Pawar)
दमानियांचे पोस्ट नेमकी काय?
पत्रकार परिषदेचा उल्लेख केलेल्या पोस्टमध्ये दमानिया म्हणतात की, अजित पवारांचे राम आणि श्याम (अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण, मी मुंबईत परत आले आहे. तुमच्या मालकांना (अजित पवारांना ) निरोप द्या, उद्या माझा पासपोर्ट आणि उत्पन्नाचा स्रोत व इनकम टैक्स रिटर्न्स घेऊन येते, कुठे व कधी दाखवू ते कळवा. आणि हो, येतांना आपल्या १० पास अर्थ मंत्र्यांनी त्यांचे उत्पन्न कसे व कुठून येते त्याचाही तपशील आणायला सांगा. वेळ कळवली नाहीत तर दुपारी ४ वाजता मी माझ्य राहत्या घरून प्रेस कांफ्रेंस घेईन असा इशारा दमानियांनी दिला आहे.
अजित पवारांचे राम आणि श्याम (अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण, मी मुंबईत परत आले आहे. तुमच्या मालकांना (अजित पवारांना ) निरोप द्या, उद्या माझा पासपोर्ट आणि उत्पन्नाचा स्रोत व इनकम टैक्स रिटर्न्स घेऊन येते, कुठे व कधी दाखवू ते कळवा. आणि हो, येतांना आपल्या १० पास अर्थ मंत्र्यांनी…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 16, 2024
…तर राम श्याम बाहेर येऊन प्रत्युत्तर देतात
हल्ली अनेक पक्षांमधील नेते त्यांची बाजू मांडण्यासाठी, त्यांच्यावरील टीकेला व टीकाकारांना उत्तर देण्यासाठी राम आणि श्याम बाळगतात. या नेत्यांवर कोणी टीका केली तर हे राम-श्याम बाहेर येऊन प्रत्युत्तर देतात असे दमानिया म्हणाल्या. फडणवीसांवर कोणी टीका केली की प्रसाद लाड, प्रवीण दरेकर बाहेर येतात. अजित पवार यांच्याविरोधात कोणी चकार शब्द काढला तरी लगेच अमोल मिटकरी, सुरज चव्हाण बाहेर येऊन वाट्टेल ते बोलतात. यांच्याकडे बोलण्याचं ताळतंत्र नसल्याचे त्या म्हणाल्या.
Video : आळंदीच्या जनसन्मान यात्रेत ‘शोले’ बाजी; पोलिसांचा उल्लेख करत अजितदादांनी भरला ‘दम’
गुलाबी गाड्या कार्यकर्त्यांसाठी पैसा कुठून येतो
आज दुपारी चार वाजता मी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत मी माझ्या उत्पन्नाची माहिती देणार आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे आणि या राज्याच्या राजकारणातील नेत्यांनी देखील त्यांच्या उत्पन्नाविषयीची माहिती द्यायला हवी. त्यांचा उत्पन्नाचा मार्ग सांगायला हवा. अजित पवारांकडे इतका पैसा कुठून येतो हे त्यांनी सांगायला हवं. गुलाबी गाड्या, कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना गाड्या देण्यासाठी पैसे येतात कुठून? हा अफाट खर्च ते कसा करतात हे अजितदादांनी एकदा स्पष्ट करायला हवं असे दमानिया यांनी म्हटले आहे.