मतदानाची टक्केवारी दाखवणारं अ‍ॅप बंद! नग्न झालेला निवडणूक आयोग; आव्हाडांची घणाघाती टीका

  • Written By: Published:
मतदानाची टक्केवारी दाखवणारं अ‍ॅप बंद! नग्न झालेला निवडणूक आयोग; आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Election Commission : विधानसभा निवडणुकीत महाविकास ( Election Commission) आघाडीतील तीनही घटक पक्षांचा दारूण पराभव झाला. तर, महायुतीला विक्रमी विजय मिळाला आहे. यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सातत्याने यासंबंधी आकडेवारी सादर करत प्रश्न विचारले जात आहेत. राज्यात आणि देशभरात ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत असतानाच आता जितेंद्र आव्हाडांनी आणखी एक दावा केला आहे.

निवडणुक निकाल आणि उमेदवारांना मिळालेल्या मतांबद्दल माहिती देणारे निवडणूक आयोगाचे ‘वोटर टर्नआऊट’ हे अ‍ॅप बंद झाल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी यासंबंधी पोस्ट केली आहे. ”सगळा नग्न झालेला निवडणूक आयोग आता अ‍ॅप्लिकेशन बंद करुन नग्नपणा झाकायचा प्रयत्न करत आहे. काल परवापर्यंत लोकसभेचा डाटा अ‍ॅक्सेस करता येत होता. मग विधानसभेच्या वेळेला का बरं बंद केला?, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. ”गोलमाल है भाई सब गोलमाल… इलेक्शनची मतदानाची टक्केवारी बदलते कशी”, असेही आव्हाडांनी म्हटलं आहे.

EVM की बॅलेट..अमेरिकेत मतदान होते तरी कसे? जाणून घ्या, इंटरेस्टिंग फॅक्ट्स

Voter turnout ची एप्लिकेशन बंद ?

सगळा नागडा झालेला इलेक्शन कमिशन आता एप्लिकेशन बंद करून नागडे पणा झाकायचा प्रयत्न करत आहे. ?

काल परवा पर्यंत लोकसभेचा डाटा ऐक्सेस करता येत होता मग विधानसभेच्या वेळेला का बरं बंद केला.

गोलमाल हैं भाई सब गोलमाल ??

मनसे उमेदवाराला फक्त दोनच मतं

आव्हाड यांनी दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार राजेश येरूणकर यांचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. येरूणकर यांच्या घरात चार मतदार असताना अवघी दोन मते पडली आहेत. आव्हाड म्हणाले की, ”राजेश येरूणकर सांगत आहेत की, मी उमेदवार असलेल्या भागात मनसेला फक्त २ मते मिळाली. माझ्या आई, पत्नी, मुलीने सुद्धा मला मतदान केले नाही हे शक्य नाही. ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के भरलेली होती. फॉर्म क्र. १७सी आणि ईव्हीएम अनुक्रमांक जुळत नाहीत. ही लोकशाहीची हत्या आहे”.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube