धक्कादायक! मुलगा होत नसल्याने पत्नीला विहिरीत ढकलले; आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

धक्कादायक! मुलगा होत नसल्याने पत्नीला विहिरीत ढकलले; आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Attempted Murder of Wife : पत्नीचा मानसिक छळ करून तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने खुद्द पतीने विहिरीत ढकलल्याची घटना तालुक्यातील मनब्दा येथे घडली असून, पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपी (Murder) पतीविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चार मुली झाल्यानंतरही मुलगा होत नसल्याच्या रागातून पतीने हे कृत्य केलं आहे.

शासनाकडून ‘बेटी बचाओ’ याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. मुली ह्या प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत, नारीशक्तीचे पूजन करण्याची आपली संस्कृती आहे. परंतु, अद्यापही कुळाचा दीपक म्हणून मुलीपेक्षा मुलगा व्हावा ही अपेक्षा करणारे अनेक जुन्या विचाराचे लोकं समाजात आहेत.

धनंजय मुंडे अर्थसंकल्पाआधी मंत्रीपदाचा राजीनामा देणार?, पत्नी करुणा मुंडे यांनी थेट तारीख सांगितली

या विचारापोटी ते कुठल्याही स्तरावर जाऊन गुन्हे करतात. असेच तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथील रहिवासी असलेल्या रणजीत रामभाऊ मोरे (वय ३९) यांच्या सोबत नंदाचा गत १३ वर्षांपूर्वी लाग्न झाले होते. लग्नानंतर पती रणजीत मोरे याला त्याचे पत्नीपासून मुलगा पाहिजे होता. परंतु, पहिली, दुसरीहीच झाली.

मुलाची अपेक्षा असल्याने पुन्हा दोन अपत्य होऊ दिले. परंतु, त्याला मुलीच झाल्या. एकूण चार मुली झाल्यानंतर रणजीत त्याच्या पत्नीचा मानसिक छळ करत होता. ता. २२ जानेवारी रोजी रात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान त्याने पत्नीला विहिरीत लोटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कालमान्वये गुन्हे दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे करीत आहेत. आरोपी रणजीत रामभाऊ मोरे यास पोलिसांनी अटक करून न्यायालया पुढे उभे केले असता, न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube