लेट्सअप मराठीच्या बातमीला अतुल लोंढे यांचा पाठिंबा; भाजपच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
तेलंगणातील निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात आल्याचा दावा ‘लेट्सअप मराठी’ने प्रसिद्ध केल्यानंतर वादाला तोंड फुटले.
Atul Londhe supports Letup Marathi’s news : तेलंगणामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात आल्याचा दावा ‘लेट्सअप मराठी’ने प्रसिद्ध केल्यानंतर वादाला तोंड फुटले. भाजपचे प्रवक्ते प्रकाश गाडे यांनी या वृत्तावर आक्षेप घेत, तेलंगणातील निवडणुका ईव्हीएमवरच पार पडल्याचा दावा केला. तसेच, चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करत संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. मात्र, त्यांच्या या दाव्याला सोशल मीडियावरून जोरदार विरोध झाला. अनेक नेटकऱ्यांनी गाडे यांच्या वक्तव्यावर टीका करत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, तेलंगणा राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी Indian National Congress ला लक्षणीय यश मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात आल्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मतमोजणीनंतर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असून, Bharatiya Janata Party ला अपेक्षेपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली. भाजप ईव्हीएमवरून बॅलेट पेपरवर यायला तयार नाही. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता इतकीच प्रचंड असेल, तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हान त्यांनी दिले. तेलंगणात जे चित्र दिसून आले, तेच देशभर असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तेलंगाना मे स्थानीय चुनाव बॅलेट पेपर पर हुए
नतीजा देखिये
INC 1347
BRS 714
BJP 261
OTHERS 259जहा मशीन होती है वहा भाजपा होती है
जहा कागज होता है वहा भाजपा नही होती 🙏— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) February 14, 2026
दरम्यान, या निवडणुकांबाबतची पक्षनिहाय आकडेवारी ‘लेट्सअप मराठी’ने प्रसिद्ध केली होती. ही आकडेवारी फेक असल्याचा दावा भाजपच्या सोशल मीडिया विभागाने केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना लोंढे म्हणाले की, भाजपच्या आयटी सेलने कितीही खोटं बोललं तरी लोकांना सत्य कळतंच. घाबरलेला भाजप आयटी सेलच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र त्यामुळे सत्य बदलणार नाही.
लेट्सअप मराठीचं वृत्त सत्यचं; भाजपा प्रवक्त्याची दिवाळखोरी, नेटकऱ्यांनी धू-धू धुतला
या वादात ‘लेट्सअप’चे संपादक योगेश कुटे यांनीही उडी घेतली. प्रकाश गाडे यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्यांनी टोला लगावला की, भारतीय जनता पक्षाकडे हुशार प्रवक्ते असतील असा समज होता; पण काहीजण ‘व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी’चे कुलगुरू असल्याचे दिसत आहे. प्रकाश गाडे यांनी स्वतःच विसंगत पोस्ट करून स्वतःची फजिती करून घेतली आहे.
तेलंगणातील निवडणुकांवरील या वादामुळे ईव्हीएम विरुद्ध बॅलेट पेपर हा जुना मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
