‘2 कोटी द्या, अन्यथा हातपाय तोडीन…’ वाल्मिक कराडने धमकावलं? पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

‘2 कोटी द्या, अन्यथा हातपाय तोडीन…’ वाल्मिक कराडने धमकावलं? पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Update : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील खंडणीप्रकरणात आरोपी वाल्मिक कराडने 31 डिसेंबर रोजी सीआयडीसमोर सरेंडर (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात आता आणखी एक पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागलाय. एका फोन कॉलमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात (Walmik Karad) एक फोन कॉल तपास यंत्रणेच्या हाती लागला (Beed News) आहे. खंडणी प्रकरणाच्या तपासामध्ये हा सर्वात मोठा क्ल्यू ठरू शकतो.

डिसेंबर महिन्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील जुलूमशाही, दडपशाही, खंडणीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. मागील काही दिवसांत बीडमध्ये किती (Beed News) खून झाले, अपहरण झाले याची देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान मस्साजोग येथील खंडणी प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा क्लू लागलेला आहे.

मोठी बातमी! अंजली दमानिया अन् मनोज जरांगे पाटील यांच्यावर लातूर जिल्ह्यात गुन्हा दाखल

तपास यंत्रणेच्या हाती एक फोन कॉल लागला आहे. या कॉलमध्ये आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून दोनSarpanch Sant कोटीSarpanch Sant रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचं समोर आलंय. तसंच दोन कोटी रूपये दिले नाहीतर हातपाय तोडून कायमची वाट लावेन, अशी वाल्मिक कराडने धमकी दिल्याचा देखील आरोप केला जातोय. परंतु कॉलमधील आवाज नेमका कोणाचा आहे, याची तपासणी केली जाणार आहे. या आवाजाचा नमुना आता सीआयडी तपासणार आहे. हा आवाज वाल्मिक कराडचाच आहे का, याची देखील तपासणी होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीत विघ्न? पाकिस्तानने आयसीसीला दिली नवी डेडलाइन; नेमकं काय घडलं..

आवाजाचे नमुने जुळले तर वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार, यात शंका नाही. कराडच्या आवाजाचा नमुना देखील घेण्यात आलाय. आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी असलेले सुनील शिंदे यांना 29 नोव्हेंबर 2024 रोजी शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटेने फोन केला होता. वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचं सांगितलं. त्यावेळी फोनवरील व्यक्तीने शिंदेंना काम बंद करा, अन्यथा गंभीर परिणाम होतील, असं धमकावलं होतं.

त्यानंतर सुदर्शन घुले त्याच दिवशी काम सुरू असलेल्या साईटवर पोहोचला. काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू. काम सुरू ठेवायचं असेल तर दोन कोटी रूपये द्या, असी मागणी घुलेनी केली. हे सर्व बोलणं सुनील शिंदे यांच्या मोबाईलमध्ये होतं. हेच रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube