मोठी बातमी; मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; आकडा समोर

मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर; महायुतीचा आराखडा जवळपास अंतिम टप्प्यात; भाजप 140 जागांवर लढणार तर शिवसेनेना 84 जागांवर लढणार.

  • Written By: Published:
Untitled Design (155)

BJP and Shivsena’s seat-sharing formula for Mumbai Municipal Corporation : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत(Shivsena) गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावर चर्चा सुरू होती. या चर्चांनंतर आता मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला असून, महायुतीचा आराखडा जवळपास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांपैकी भाजप 140 तर एकनाथ शिंदे(DCM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला 87 जागा देण्यावर सहमती झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे, महायुतीतील अजित पवार(Ajit Pawar) गटाची राष्ट्रवादी काँग्रेस ही मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे. त्यामुळे भाजप(BJP) आणि शिंदे सेनेतच 227 जागांचे वाटप झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अधिकृत शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने शिंदे गटासाठी केवळ 52 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मुंबईतील राजकीय समीकरणं बदलली. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेला अधिक जागा देण्याचा सकारात्मक विचार करण्यात आला आणि त्यातूनच 87 जागांचा फॉर्म्युला पुढे आला असल्याची माहिती आहे.

ब्रेकिंग : पवारांच्या एकनिष्ठ शिलेदाराची ‘पंजा’शी हातमिळवणी; जगतापांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचं ‘वेट अँड वॉच’ धोरण

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने सध्या ‘वेट अँड वॉच’ धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि पनवेल या महत्त्वाच्या महापालिकांमधील जागावाटपाचा पेच अद्याप कायम आहे. मात्र उद्यापर्यंत या सर्व ठिकाणचं जागावाटप अंतिम होईल, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.

15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला असून, तेव्हापासून पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. मागील निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्या वेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या महापौर होत्या.

क्रूर घटना! बीड जिल्ह्यात 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, गावकाऱ्यांची संतापजनक भूमिका

महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम कसा असेल?

नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
मतदान- 15 जानेवारी 2026
मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

राज्यात 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी; मागील निवडणुकीत कोणाची कुठे आणि किती होती ताकद?

2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीतील पक्षीय बलाबल

शिवसेना- 84
भाजपा- 82
काँग्रेस- 31
राष्ट्रवादी काँग्रेस- 9
मनसे- 7
समाजवादी पक्ष- 6
एमआयएम- 2
अपक्ष- 5

follow us