देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती; दगडावरील फिंगर प्रिंटच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा चर्चेत

चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून सोशल मीडियावरही व्हिडिओ व्हायरलं आहे.

News Photo   2026 08 02T211622.810

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (BJP) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या विधानाची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्या भाषणातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयासंदर्भात पहाटे चार वाजता पत्रकार परिषद घेण्यास भाग पाडले होते. तसेच राज्यात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात सामान्य नागरिकांची परिस्थिती सुधारेल, अशा पद्धतीने काम कोणीही केले नाही, असा दावा त्यांनी केला.

याच भाषणात बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, “देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती आहे,” असे विधान केले. पुढे त्यांनी फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत, वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी ते नागपूरचे महापौर झाले होते आणि महापौर परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते, असे सांगितले.

चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून सोशल मीडियावरही या वक्तव्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. समर्थकांकडून या विधानाचे स्वागत केले जात असताना, विरोधकांकडून त्यावर टीकाही केली जात आहे.

follow us