संभाजीनगरमध्ये भाजपच्या अहंकारामुळे शिवसेना-भाजप युती तुटली; संजय शिरसाटांची घोषणा

Sanjay Shirsat यांनी अहिल्यानगरनंतर आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्येही महायुती फुटली आहे. याबाबत घोषणा केली आहे.

Sanjay Shirsat

BJP Shivsena Allince break in Chhatrapati Sambhajinagar Sanjay Shirsat Anounced : अहिल्यानगरनंतर आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्येही (Chhatrapati Sambhajinagar Mahapalika Election) महायुती फुटली आहे. याबाबत मंत्री संजय शिरसाटांनी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shivsena) स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला.

काय म्हणाले संजय शिरसाट?

यावेळी बोलताना संजय शिरसाटांनी भाजपवर जोरदार टीका देखील केली. ते म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना-भाजप युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी प्रयत्न केला. आम्ही देखील स्थानिक पातळीवर वारंवार बैठकांचा प्रयत्न केला. पण स्थानिक भाजप कार्यकर्ते हे पहिल्यापासूनच वेगळ्या भूमिकेत होते. त्यावेळी शंका आली तरी वरिष्ठांच्या आग्रहास्तव युतीचा प्रयत्न केला गेला. कारण हे शहर संवेदनशील शहर आहे.

‘हक़’च्या यशावर यामी गौतम धरच्या साधेपणाने जिंकली मनं, जाणून घ्या तिने श्रेय कुणाला दिलं?

त्यामुळे युतीच्या नऊ ते दहा बैठका झाल्या. एक बैठक बावनकुळेंसोबतही झाली. यासाठी एकनाथ शिंदे आणि फडणवीस देखील संपर्कात होते. जागा वाटपाचं ठरलं पण त्यांनी जागेचा प्रस्ताव देताना त्यात मेख मारली. त्यातून शिवसेनेत बेचैन झाले . त्यात त्यांनी तिकडे उमेदवारांना फॉर्म भरायला सांगितले दुसरीकडे त्याच्या चर्चा सुरू होती. त्यांनी आमच्या भूमिकेला तडा दिला आहे. आपली ताकत वाढली आहे. आम्ही काहीही करू शकतो या अहंकारामुळे ही युती तुटली असल्याचं म्हणत शिरसाटांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

follow us