शरद पवारांकडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याची भाषा; चंद्रशेखर बावनकुळेंचा गंभीर आरोप…
Bawankule on Sharad Pawar : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर (Sharad Pawar) शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याची भाषा केली जात आहे. यामागील त्यांचा हेतू लक्षात येत नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केल आहे.
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी PMPMLचे कर्मचारी आक्रमक, पुण्यात पुकारलं कामबंद आंदोलन
जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातील जनता दंगलीपर्यंत जाईल अशी परिस्थिती कधी नव्हती आणि होणारही नाही. पण काही लोक समाजात तेढ निर्माण करणं, अशी काही आंदोलनं निर्माण करत आहेत, ज्यामधून तेढ निर्माण होईल. समाजाला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करत आहेत असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे. राज्यात वेगवेगळी आंदोलनं तयार करून समाजासमाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. शरद पवार यांनी दंगली घडवण्याची भाषा का केली? त्यांच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही, अशी शंकाही बावनकुळे यांनी उपस्थित केले.
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसचे नेते गेले नाहीत. ते बाहेर बोलून या मुद्द्यावरुन राजकारण करत आहे. काँग्रेसने समाजात तेढ निर्माण करून वाद निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवला आहे. यासाठी काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी यावेळी केला. महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतात. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल. तेव्हा हे सरकार गरीब कल्याण योजना राबवणार असल्याचा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
भारत तिरंदाजीत इतिहास घडवणार; नेमबाजीत आणखी दोन पदकं मिळणार, वाचा आजचं वेळापत्रक
वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केलं जात आहे. प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी बोलले असतील, देवेंद्र फडणवीस यांची मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयातील भूमिका प्रामाणिक आहे. त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे. पण लोक सुज्ञ आहेत, असही बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत.