Maharashtra Politics :’ठाकरेंच्या अहंकारामुळे मुंबईचा विकास रखडला’, CM शिंदेनी डागली तोफ

Maharashtra Politics :’ठाकरेंच्या अहंकारामुळे मुंबईचा विकास रखडला’, CM शिंदेनी डागली तोफ

मुंबई : मुंबईच्या विकासाचं गेल्या अडीच वर्षे अहंकारामुळे रखडलं होतं. आता विकासाचं विमान चांगलंच भरारी घेतं आहे, कारण गतीमान सरकार आलं. काही व्यक्तींच्या अहंकारामुळे बुलेट ट्रेन रखडली, मुंबईचा विकास रखडला होता (Maharashtra Politics) असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज आपण मुंबईत विकासाची कामं पाहिली तर मागील ९ महिन्यात आपण म्हणजे या सरकारने एवढे निर्णय घेतले की ते लोकांच्या समोर आहेत. पंचामृत अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. काही लोकांच्या अट्टाहासामुळे रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला आपण गती आली. आरे कारशेड, मेट्रो ३ हे कुणामुळे थांबले होते ? आपल्याला माहित आहे. मात्र आपलं सरकार आल्यावर आपण लगेचच निर्णय घेतला असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितल.

शिंदेंचे आमदार सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल, फडणवीसांची माहिती

अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार हे सरकार आहे. यामुळे अनेकांच्या छातीत धसकी भरली आहे आणि पायाखालची जमीन सरकल्याचे त्यांनी यावेळी सांगितल. शेतकरी बांधवांनाही आपल्या सरकारवर विश्वास आहे. विकासाची संकल्पना घेऊन सरकार पुढे एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे.

उत्तर ऐकण्यापूर्वी विरोधकांनी पळ काढला, मुख्यमंत्री म्हणाले…

आपलं सरकार महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारं सरकार आहे. फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आपण सरकार चालवत नाही. याअगोदरच काय अनुभव होता ते सगळ्यांना माहित आहे. मुंबईच्या विकासाचं विमान गेल्या अडीच वर्षापासून रखडल आणि अहंकारी धोरणामुळे मुंबईचा विकास झाला नाही.

मात्र आपलं सरकार आल्यावर विकासाच्या विमानाने टेक ऑफ घेतला. यामुळे अनेकांना पोटदुखी होते असेल. रखडलेल्या प्रकल्पांना आपण मार्गी लावत आहोत. मेट्रोची कामं, रस्त्यांचं काँक्रिटीकरण अशा अनेक कामांनी वेग घेतला. मुंबई सुंदर आणि स्वच्छ होत आहे. गेल्या अनेक वर्षे जी कामं झाली नाही ती आम्ही करत आहोत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube