मुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमधून घेतली पवारांच्या धमकीची दखल; म्हणाले पवार हे…

मुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमधून घेतली पवारांच्या धमकीची दखल; म्हणाले पवार हे…

Eknath Shinde On Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी आल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबई पोलिस आयुक्त यांची भेट घेत तक्रार दाखल केली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे  ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे शिंदेंनी ट्विटमध्ये म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.

‘हा तर सरकारपुरस्कृत दहशतवाद’; धमक्यांनंतर राऊतांचा सरकारवर घणाघात

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस सुट्टीवर आहेत. ते आपल्या कुटूंबासह काश्मीरमध्ये गेले आहे. तिथून त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन हे ट्विट केले आहे. शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव सौरभ पिंपळकर असल्याचे समजते. त्याच्या ट्विटरच्या बायोवर भाजप कार्यकर्ता असल्याचा उल्लेख असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटले आहे. तसेच खरंच तो भाजपचा कार्यकर्ता आहे की, नाही याची माहिती नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube