नारायण राणेंसमोर मुख्यमंत्री शिंदेंचा कोकणासाठी घोषणांचा पाऊस

नारायण राणेंसमोर मुख्यमंत्री शिंदेंचा कोकणासाठी घोषणांचा पाऊस

CM Eknath Shinde at Sawantwadi :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सावंतवाडी दौऱ्यावर होते.  शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंतवाडीतून बोलत होते. यावेळी त्यांनी कोकणाच्या विकासासाठी महत्वाच्या घोषणा केल्या. MMRDA च्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी कोकणासाठी घोषणांचा पाऊस पाडला आहे.

कोकणाच्या पर्याटनासाठी सर्वोतपरी मदत करणार असून आंबोली येथे हिल स्टेशन उभारणार, असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच  सावंतवाडीसाठी 110 कोटींचा निधी देणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.  पर्यटनवाढीसाठी लागणार निधी राज्य सरकार देणार.  मुंबई-गोवा महामार्गाला चालना देण्याचा प्रयत्न करणार, असे त्यांनी सांगितले.

Cabinet Expansion : ‘जो साब देगा वो हम लेगा’ : गोगावलेंचं मंत्रीपद कन्फर्म!

तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या खात्यातील योजनाही आपण घेणार. चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै असे नाव देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच MMRDA च्या धर्तीवर  कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  जगाला हेवा वाटावा असा कोकण तयार झाला पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

Lok Sabha : मशागत कशी करायची अन् घात कशी साधायची यात वस्ताद : राजू शेट्टींनी थोपडले दंड!

यांसह पर्यटनवाढीसाठी लागणारा निधी राज्य सरकार देणार. अडीच वर्षांपूर्वी जे स्पीड ब्रेकर निर्माण केले गेले ते सर्व दूर केले गेले. मागच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प थांबवले गेले. आम्ही जो प्रस्ताव केंद्राला पाठवतो त्यासाठी संपूर्ण पैसा केंद्र सरकार देते. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे आभार मानतो. याआधी इतका निधी कोणी दिला नाही. सिंधुदुर्गाला निधी कमी पडू देणार नाही. नारायण राणे यांच्या खात्यातील योजनाही आपण घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube