सावध राहा, पुढील 48 तास पुणे, अहिल्यानगरसह ‘या’ 13 जिल्ह्यांत थंडीची लाट; अलर्ट जारी

Maharashtra Weather Alert : राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून तापमानात बदल होत असल्याने राज्यात थंडी वाढली आहे.

  • Written By: Published:
Maharashtra Weather Alert

Maharashtra Weather Alert : राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून तापमानात बदल होत असल्याने राज्यात थंडी वाढली आहे. अचानक वाढलेल्या या थंडीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणसह राज्यातील काही भागात पुढील काही दिवस गारवा कायम राहणार आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

तसेच तापमानाचा पारा (Maharashtra Weather Alert) घसरल्याने पुढील 2 दिवस तब्बल 13 जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट राहणार असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई, ठाणेसह कल्याण- डोंबिवली भागात आज सकाळपासून थंडी जाणवत आहे. आज दिवसभर आकाश स्वच्छ राहणार असल्याने सकाळी आणि संध्याकाळी गारवा वाढण्याची शक्यता असून किमान तपमान 17–19°C च्या दरम्यान असणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात देखील थंडी वाढली आहे. पुणे जिल्ह्यात वाढत असलेली थंडीमुळे हवामान विभागकडून पुणे जिल्ह्यसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आले आहे. मंगळवारी पुण्यातील शिवाजीनगर, विमानगर या परिसरात मागील दोन वर्षांच्या तूलनेत सर्वात कमी तापमान नोंदले गेले आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीची लाट तपमानात घरसर झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील थंडीची लाट निर्माण झाली आहे.

मेहुल चोक्सीला मोठा धक्का! बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा-

धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये पुढील दोन थंडीची लाट राहील. तर सोलापूरसह, संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यात देखील पुढील 48 तास थंडीचा लाट असणार आहे.

follow us