उत्तरेतील शीतलहरींमुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासांत थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra मध्ये पुढील 24 तासांत थंडीचा जोर वाढणार आहे. कारण उत्तर भारतामध्ये शीतलहरी निर्माण होणार आहेत.

Weather Update : पारा 13 अंशांवर, हुडहुडी वाढणार! हवामानाचा अंदाज काय ?

Cold wave in north intensify in Maharashtra in next 24 hours; Meteorological Department predicts : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीमुळे नागरीकांना प्रचंड हुडहुडी भरलेली आहे. मात्र आता ही थंडी कमी होण्या ऐवजी आणखी वाढणार असल्याचं केंद्रीय हवामान विभागाने सांगितलं आहे. याचं कारण म्हणजे उत्तर भारतामध्ये शीतलहरी निर्माण होणार आहेत. त्याचा परिणाम राज्यावर होणार असल्याने महाराष्ट्रात पुढील 24 तासांत थंडीचा जोर वाढणार आहे.

महाराष्ट्रात पुढील 24 तासांत थंडीचा जोर वाढणार…

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतामध्ये बहुतांश ठिकाणी शीत लहरी निर्माण होणार आहे. त्यामुळे तेथे थंडी आणि दाट धुक्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचा परिणाम झाल्याने महाराष्ट्रात अगोदरच किमान तापमान प्रचंड खाली गेले आहे. त्यात उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात तर अनेतक ठिकाणी 10 अंशांच्या खालीच तापमान पाहायला मिळत आहे.

अजित पवारांची ‘ती’ मागणी अन् दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली! नेमकं काय घडलं?

त्यानंतर आता उत्तरेतील शीत लहरींच्या परिणामुळे उत्तर प्रदेश, पंजाब हरियाणा चंदीगडमध्या दाट धुक्याची चादर कायम राहणार आहे. त्या शीत लहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासांत थंडीचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागत देखील नागरिकांना थंडीसह करावं लागणार आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या काही भागांमध्ये तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.

follow us