दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा CM च्या खुर्चीवर डोळा, नाना पटोलेंचा घणाघात

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा CM च्या खुर्चीवर डोळा, नाना पटोलेंचा घणाघात

Nana Patole News : दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर डोळा लावून बसले असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अजित पवारांसह देवेंद्र फड़णवीसांवर केला आहे. मुंबईत आज नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाध साधला. त्यावेळी ते बोलत होते. (congres leader nana patole critisize DCM Devendra Fadnvis & Ajit Pawar)

https://letsupp.com/maharashtra/north-maharashtra/we-will-not-leave-mla-rohit-pawar-threatened-ram-shinde-77260.html

नाना पटोले म्हणाले, राज्य सरकारची सध्या गंमत जंमत सुरु आहे. महाराष्ट्रातल्या 17 जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेऊन बसलेत, की हा जाईल तेव्हा मी मुख्यमंत्री होईल, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

मोठी बातमी! नवाब मलिक यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

तसेच राज्य सरकारकडून जनतेच्या पैशांची लूटमार करण्यात येत आहे. अतिवृष्टी झाली आता पाऊस गायब झाला त्यांची पिके धोक्यात आली. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे होत आहेत, हे सरकार येडे बनून पेढे खाणारं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

पालकमंत्रीपदावरून दोन दादांमध्ये समेट?; ध्वजारोहणासाठी अजितदादा कोल्हापुरात जाणार

दरम्यान , राज्यात पालकमंत्री आणि मुख्यमंत्रिपदावरुन भांडण होताहेत, मुख्यमंत्र्यांच्या दालनावर अजितदादांनी कब्जा केलायं अन् मुख्यमंत्री गावाला चाललेत, हे महाराष्ट्रात चाललंय काय? कुठे नेऊन ठेवलायं महाराष्ट्र? असंही ते म्हणाले आहेत.

भाजपची मानसिकता देशाविरोधात आहेत, भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न असून हे सरकार मूठभर लोकांसाठीच काम करतं असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube