राष्ट्रवादीच्या खलबतांनंतर काँग्रेसची बैठक; लोकसभेसाठी चव्हाणांनी सांगितला Inside प्लॅन
Ashok Chavan On 2024 Loksabha Election : लोकसभा निवडणुकीला फक्त 1 वर्ष बाकी आहे. त्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी आगामी लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली होती. यानंतर आता काँग्रेसने देखील आपली आढावा बैठक घेतली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
आप-आपल्या जागावाटपासंदर्भात भूमिका मांडावी, जेणेकरून जागेची निश्चिती करता येईल. त्याअनुषंगाने काँग्रेसने जागेसंदर्भात असा निर्णय घेतला आहे किमान त्या त्या जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे. देशात झपाट्याने राजकीय परिस्थिती बदलत आहे. विद्यमान मोदी सरकारच्या विरोधात वातावरण आहे. त्याला बळ देण्याचं काम कर्नाटकच्या निकालाने केलं असल्याचे चव्हाण म्हणाले.
उद्या शिरुरमधून अजित पवारही इच्छुक असेल, तुम्हाला काय त्रास? अजितदादांचा सवाल
दोन दिवसांच्या बैठकीत साधक बाधक चर्चा होऊन काय चित्र आहे ते समोर येतंय हळूहळू. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा कार्यकर्ते, नेत्यांच्या माध्यमांतून दोन दिवस आढावा घेतला जाणार आहे. निवडणुका लढल्या जातात. बऱ्याचवेळा देशपातळीवरील विषय असतात. अनेकदा लोकल पातळीवर विषय असतात, असे त्यांनी सांगितले.
आपण लोकल फॉर व्होकल हा विषय आपण कर्नाटकात अनुभवला. लोकल विषयांवर प्रभावीपणे प्रचार केल्यानंतर, लोकांच्या मनातील सरकार कसं असलं पाहिजे, त्यांना भेडसावणारे प्रश्न काय आहेत यासंदर्भात प्रचार व्हावा अशी लोकांची इच्छा असते.
अदानी दुसऱ्यांदा पवारांना भेटले; अजितदादांनी कारण टाळलं पण लॉजिक सांगितलं
आज आणि उद्या दोन दिवस एकंदरीत राज्यातील राजकीय परिस्थिती, वस्तुस्थिती काय आहे, त्या त्या मतदारसंघातील लोकांचं काय म्हणणं आहे, कोणत्या मुद्द्यासंदर्भात विषय आहे, जनरल फिडबॅक घेण्याचं काम सुरू आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे, धुळे, नंदूरबार या चार मतदारसंघातील चर्चा सकाळपासून सुरू झाली आहे, असे चव्हाणांनी सांगितले.