स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस’चा एकला चलो नारा, वडेट्टीवांरांची मोठी घोषणा
मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र, या घडामोडी सुरू असतानाच आता महाविकास आघाडीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. (Congress) आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही, हे स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेची तिजोरी खाली झाली आहे. मुंबईत भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. खिरापत वाटली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला समोरं जाऊ असंही ते म्हणालेत.
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस सज्ज! पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विविध कमिट्यांची स्थापना
मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. तसंच, पक्षाच्या हायकमांडबरोबर चर्चा झाल्यानंतरच पक्षाच्या स्थानिक नेत्यांना त्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे आणि आमच्या लोकांनी देखील तेच ठरवलं असल्याचं वडेट्टीवार म्हणालेत.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही राज ठाकरे तर सोडाच, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही निवडणूक लढवणार नाही. मी जेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हाही मी ही गोष्ट ‘डंके की चोट’ पर सांगितली होती असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट झालं होत की काँग्रेस स्वतंत्र निवडणुकांना सामोर जाणार आहे.
