बच्चू कडूंसह सेनेला धक्का, तिवसा बाजार समितीत काँग्रेस-ठाकरे गटाची सत्ता
Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे.
त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज राज्यातील 95 बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यातील 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे. त्याच बरोबर काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज देखील मतदान होणार आहे.
राष्ट्रवादीत खरंच भाकरी फिरली का?
तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचा १८ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय !!!!
सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन तसेच या एकतर्फी विजयासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक… pic.twitter.com/5UpYV7E87N— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 28, 2023
अमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. तेथे काँग्रेस आघाडीच्या मंडळाने एकहाती सत्ता मिळवली आहे. येथे पुन्हा एकदा माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांचे सर्वस्व कायम असल्याचे पाहायला मिळाले.
यानिवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या मंडळाने १८ पैकी १८ जागा जिंकून विरोधानकांचा धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी प्रथमच ठाकरे गटासोबत निवडणूक लढवली होती. येथे महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळाली होती. काँग्रेस व ठाकरे गट एकत्र लढले तर राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली. हा यशोमती ठाकूर यांचा मोठा विजय मानला जात आहे तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, युवा स्वाभिमान पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.