भोंदू खरात प्रकरणी आमदारांवर कारवाई करा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘माकप’चे निदर्शने

अशा भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

News Photo   2026 04 06T205212.281

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने भोंदू अशोक खरात (Kharat) यांना भेटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, तसेच राज्यात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अशा भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

या वेळी महाराष्ट्र विधिमंडळातील जे आमदार भोंदू अशोक खरात यांना भेटले, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. अशा प्रकारच्या घटनांमुळे महाराष्ट्राची देशभरात मोठ्या प्रमाणावर बदनामी होत असूनही सरकार योग्य ती पावले उचलत नसल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले.

कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा पुन्हा वेळकाढूपणा; शेतकरी नेते अजित नवले

महाराष्ट्राची ओळख ही पुरोगामी राज्य म्हणून असताना राज्यातील काही आमदार, मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अशा भोंदू बाबा-बुवांच्या पुढे लोटांगण घालत असल्याची घटना अत्यंत खेदजनक असल्याची टीका यावेळी करण्यात आली. अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत

आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी

या निदर्शनात पक्षाचे सचिव कॉ. भगवान भोजने, कॉ. प्रकाश पाटील, कॉ. सचिन गंडले, कॉ. भाऊसाहेब झिरपे, कॉ. अजय भवलकर, कॉ. मंगल ठोंबरे, कॉ. गोरख राठोड, कॉ. सुनीता लोंढे, कॉ. विशाल भुमरे, कॉ. दामोदर माणकापे, कॉ. सुनील राठोड, कॉ. मनिषा बल्लाळ आदींसह पक्षाच्या विविध जनवादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते

follow us