नागपूर दंगलीनंतर फडणवीसांची राणेंना समज? पण बाहेर येताच राणे म्हणाले…

Devendra Fadanvis warn to Nilesh Rane after The Nagpur Violence : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील अनेक शहरात आंदोलन होत आहे. नागपूर शहरात देखील या मागणीसाठी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) आंदोलन करण्यात आला होता.
सुनीता विल्यम्सच्या लँडिंगचे शेवटचे 45 मिनिटे भयानक का असतील, स्प्लॅशडाउन म्हणजे काय?
मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. यावरून गेल्या काही दिवसांपासून हिंदू जनजागृती आणि लव्ह जिहादविषयी आक्रमक पवित्रा घेतलेले निलेश राणे यांना देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याचे बोलले जात आहे.मात्र आपण फडणवीस यावर राणे यांनी असे झाल्याचे नाकारले आहे.
…तर मोदींना सांगून ते थडगे काढण्यास का सांगत नाही? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
आज मंगळवारी 18 एप्रिल 2025 ला राणे यांनी विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांना फडणवीसांनी पुढील काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. असे सांगण्यात येत आहे. तर फडणवीसांनंतर राणेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याचे देखील सांगण्यता येत आहेत.
नगर हादरले! दहा कोटींसाठी व्यापाऱ्याचा खून; निलंबित पोलिसासह एकाला बेड्या
मात्र ज्यावेळी राणे बाहेर आले असता त्यांना याबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते संतापले. असं काहीही झालं नसून आपण मुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेलो होतो. असंही ते म्हणाले. तसेच मत्सविभागाचा कार्यक्रम आहेत त्याची पत्रिका देण्यासाठी गेले होते असं नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ते म्हणाले तुम्ही बिनधास्त माझ्या बातम्या चालवा. मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आहे.त्यामुळे एकीकडे राणेंना समज दिल्याची बातमी समोर येत असताना राणे मात्र आहे त्याच अविर्भात दिसून आले.