फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या; आतापर्यंत आम्ही काय चकाट्या पिटत होतो? दमानियांचा सवाल…
Devendra Fadnavis : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आंदोलन सुरू केलं. त्यासाठी त्यांनी बीडमध्ये तळ ठोकला. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, अशी भूमिका दमानिया यांनी घेतली. त्यानंतर आज त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे कार्यकर्ते आपला मानसिक छळ करत असल्याचा गंभीर केला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं.
Nora Fatehi : नोरा फतेहीचा साडीतील लूक, चाहते बघतच राहिले
अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी, असं फडणवीस म्हणाले.
आम्ही कोणालाही वाचवू देणार नाही…
देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड, परभणी आणि पुण्यात मोर्चे काढले जात आहे. तसेच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते माझा छळ करत असल्याचा आरोप केला. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, मोर्चे काढण्याचा अधिकार सगळ्याना आहे. बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने कारवाई करत आहेत. काहीही झाले तरी या प्रकरणात कोणी कोणाला वाचण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणालाही वाचवू देणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
Janhvi Kapoor : जांभळ्या रंगाच्या साडीत खुललं जान्हवीचं सौदर्यं…
पुढं ते म्हणाले की, या प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी आणि हफ्ते वसुली करतात, अशा सगळ्यांना जबर बसवणार आहे. तसेच अंजली दमानिया यांची काही तक्रार असल्यास त्यांनी ती पोलिसांकडे द्यावी, पोलिस यावर निश्चित कारवाई करतील.
आम्ही काय चकाट्या पिटत होतो?
दरम्यान, फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर अंजली दमानिया यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री आता आम्हाला पोलिसांकडे जाण्यास सांगत आहेत. अरे आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होता का, असा सवाल दमानिया यांनी केला. मी डीजींना मेसेज केला, मुख्यमंत्री फडणवीस तुम्हालाही मेसेज केला. त्यांना एक कॉल करता येत नाही का? पोलिसांना सगळे डिटेल्स दिले आहेत. मात्र तरीही कारवाई केली नाही, असं दमानिया यांनी म्हटलं.
दमानिया यांचा नेमका आरोप कायम ?
अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले. मला चार दिवसांपासून बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. पहिल्या दिवशी 700-800 कॉल्स आले, फोज अजून बंद झाले नाहीत, असं दमानिया म्हणाल्या.