मोठी बातमी : जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंना थेट सरकारी नोकरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

  • Written By: Published:
मोठी बातमी : जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंना थेट सरकारी नोकरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील जागतिक किर्तीच्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंची शासनसेवेत नियुक्ती केली जाणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी या खेळाडूंची नियुक्ती केली जाणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धा, पॅराऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविलेल्या खेळाडूंना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे. (World Medal Winners Get Direct Recruitment In Maharashtra Government )

शिंदे सरकारची ‘लाडकी’ योजना का वादात सापडलीय?

शिंदेंनी टीम इंडियासाठी खुली केली तिजोरी

नुकताचं टी 20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील चार खेळाडूंचा राज्य सरकारकडून विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी शिंदेंनी राज्य सरकारची तिजोरी उघडत 11 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं. तसेच मुंबईकर असणाऱ्या रोहित शेट्टी, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांचं बक्षीस राज्य सरकारकडून देण्यात आले. त्यानंतर आता राज्य सरकारने जागतिक पातळीवर पदक मिळवणाऱ्या राज्यातील खेळाडूंची थेट सरकारी नोकरीत भरती करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

Pune : खासगी गाडीवर लाल दिवा, चेंबरवरही डल्ला; ट्रेनी IAS अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी वैतागले

विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष 

विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला राज्य सरकारने 11 कोटींचे बक्षीस जाहीर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने इतर खेळांमध्ये जागतिक पातळीवर पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना थेट शासकीय सेवेत रुजू करणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर विरोधक काय भमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube