शिंदे सरकारकडून राज्यातील महिलांना खूश करणारा आणखी एक मोठा निर्णय; शासन निर्णय जारी

  • Written By: Published:
शिंदे सरकारकडून राज्यातील महिलांना खूश करणारा आणखी एक मोठा निर्णय; शासन निर्णय जारी

Eknath Shinde Ladki Bahin Yojana Annapurna Yojana : लाडकी बहीण योजनेनंतर (Ladki Bahin Yojana) आता राज्य सरकारने राज्यातील (Eknath Shinde) महिलांना खूश करणारा आणखी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. याबबतचा शासन आदेश देखील काढण्यात आला असून, या योजनेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (Annapurna Yojana) असं नाव देण्यात आलं आहे.

‘नाहीतर शरद पवारांना त्रास होईल’, विद्या चव्हाणांच्या गंभीर आरोपांवर चित्रा वाघांचा प्रत्युत्तर

या योजने अंतर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंड मोफत मिळणार आहेत. मात्र यामध्ये महिलांच्या नावाने असलेल्या गॅस जोडणी लाच हा लाभ मिळणार आहे. तसेच एकाच कुटुंबातील एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल, एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत. अशा प्रकारच्या अटी या योजनेसाठी घालून देण्यात आले आहेत.

Sonali Kulkarni : ही शेवटची पोस्ट, सोनालीचे फोटो पाहून नजर हटणार नाही…

महाराष्ट्र सरकारच्या 2024,25 वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Pune : कोडिंग लॅग्वेज, घराचा नकाशा अन्…; ऑनलाईन गेमिंग टास्क उठला जीवावर

या योजनेसाठी पात्रता काय?

– योजनेत मोफत मिळणाऱ्या सिलेंडर साठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असावी.

– केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला

– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिला.

– एका रेशन कार्ड वर केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असेल.

– योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलेंडरचे मोफत वितरण करण्यात येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube