‘नाहीतर शरद पवारांना त्रास होईल’, विद्या चव्हाणांच्या गंभीर आरोपांवर चित्रा वाघांचा प्रत्युत्तर

‘नाहीतर शरद पवारांना त्रास होईल’,  विद्या चव्हाणांच्या गंभीर आरोपांवर चित्रा वाघांचा प्रत्युत्तर

Chitra Wagh On Vidya Chavan : काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पत्रकारांबाबत एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर भाजप आणि शरद पवार गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे.

या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ विरुद्ध शरद पवार गटचे प्रवक्ते नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी पोलीस ठाण्यात तक्रर देखील दखल केली आहे. तर आता शरद पवार गटाच्या आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी सापशिड्यांवर अनेकांचा वापर केला आहे असा गंभीर आरोप केला आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या की, चित्रा वाघ यांना सापशिडीवर जसं ढांग पडून मोठ्या शिडीवर जायचं असतं तसं आपण कोणी खूप मोठं झालोय की काय, असं त्यांना वाटतंय. चित्रा वाघ यांनी सापशिड्यांवर अनेकांचा वापर केला आहे आणि त्यात मी देखील आहे. चित्रा वाघ ही आमच्यामुळेच मोठी झाली आहे. असं या पत्रकार परिषदेमध्ये विद्या चव्हाण म्हणाल्या.

पुढे बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे नेते मुधकर पिचड, जयंत पाटील सुनील तटकरे यांच्याकडे मी तिची शिफारस केली होती त्यानंतर ती मोठी झाली आणि आज शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

तर आता विद्या चव्हाण यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनी देखील प्रत्युत्तर दिला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी विद्या चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, माझ्यावर प्रेम करणाऱ्या विद्या चव्हाण यांची प्रेस ऐकली. मी 20 वर्षात पायाचे कातडे सुद्धा काढून पक्षाला दिले आणि जी जवाबदारी पक्षाने दिली जे काय परिणाम होतील याचा विचार न करता प्रमाणिक काम केलं. चित्रा वाघ यांच्यात क्वालिटी होती म्हणून पक्षाने काही जवाबदारी दिली. मी कधीही पक्षाकडून कसली अपेक्षा केली नाही. माझ्यासोबत तुम्ही काय काय केलं? मुठ झाकलेली आहे ती उघडायला लावू नका, नाहीतर शरद पवारांना त्रास होईल असं या पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या.

विद्या चव्हाण यांना लाज वाटायला पाहिजे

विद्या चव्हाण यांनी लावलेल्या आरोपांवर बोलताना चित्रा वाघ म्हणाले की, विद्या चव्हाण यांची सून शरद पवार यांच्याकडे देखील गेली होती मात्र तिकडून रिस्पॉन्स आला नाही. त्यानंतर ती जयंत पाटील यांच्याकडे गेली होती मात्र तिकडून देखील रिस्पॉन्स आला नाही. शेवटी डाँक्टर बोलले की मी चित्रा वाघ यांच्याशी बोलतो, ज्या अवस्थेत मध्ये त्यांची सुन माझ्याकडे आली ते बघवत नव्हत. त्यानंतर मी तिला गाईड केलं. विद्या चव्हाण बोला आता तुम्ही काय करणार?.

शेतकऱ्यांवर अन्याय , पुन्हा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचा आयोजन करा, अमर काळेंचं थेट मोदींना आव्हान

विद्या चव्हाण यांना लाज वाटायला पाहिजे. मी पण आई आहे आणि एक बाईची व्यथा समजते. केली मदत काय चुकलं? एखाद्या बाईवर अन्याय होत असेल तर तेवढे सहकार्य मी करणार असं चित्रा वाघ म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube