भारताचं स्वातंत्र्य बांगलादेशामुळे अधोरेखीत होत असेल तर…सरन्यायाधिशांच्या वक्तव्यावर ठाकरे का संतापले?

भारताचं स्वातंत्र्य बांगलादेशामुळे अधोरेखीत होत असेल तर…सरन्यायाधिशांच्या वक्तव्यावर ठाकरे का संतापले?

Uddhav Thackeray on CJI Chandrachud : महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भारताचे सरन्यायाधीश यांच्यावरही जोरदार प्रहार केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाबाबदचा निर्णय पुढ्या पाच पंन्नास वर्षात नक्की मिळेल असं म्हणत निर्णयाला होणाऱ्या विलंबावरही उद्धव ठाकरे यांनी मिश्किल भाष्य केलं. तसंच, त्यांनी काल स्वातंत्र्यदिनानिमीत्त सरन्यायाधीश जे बोलले त्या एका बातमीचं कातरण सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी चांगलेच फटकारे मारले.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार? स्वत: उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, नेमक काय म्हणाले?

सरन्यायाधीश कालच्या भाषणात म्हणाले होते की बांगलादेशामुळे स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखीत होत आहे. ज्या बांगलादेशाला भारताने स्वातंत्र्य केलं त्या बांगलादेशामुळे जर का भारताचं स्वातंत्र्य अधोरेखीत होत असेल तर आपण कशाला या देशात जन्माला आलो अथा थेट घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसंच, कोणत्या पदावर आपण बसला आहात? आपण काय बोलत आहात? असा प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तिथे जो रोष निर्माण झाला त्यानंतर पंतप्रधान, सरन्यायाधीश यांना राजीनामा द्यावा लागला ही लोकसशाही तुम्हाला परवडणार आहे का असा प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

नाही तर विकेट टाकायची अन् मॅचचा आनंद घ्यायचा जागा वाटपावर ठणकावतांना ठाकरेंचं मिश्किल विधानं

काय म्हणाले होते सरन्यायाधीश?

स्वातंत्र्याचा हा दिवस संविधानाची मूल्य जोपासण्याचा आणि देशाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे. भारताने १९५०च्या स्वातंत्र्याचा पर्याय निवडला आहे. आज बांगलादेशात जे होतंय त्यावरुन स्वातंत्र्याची किंमत आपल्या लक्षात येतेय. सध्या बांगलादेश खडतर परिस्थितीतून जात आहे. भारताच्या या शेजारील देशामध्ये अशांती आहे. देशात आरक्षणाच्या विरोधात हिंसा भडकली. जूनमध्ये याची सुरुवात झाली होती आणि ऑगस्टमध्ये या मुद्द्याने जोर धरला. लोकांच्या रोषापुढे पंतप्रधान शेख हसीना यांना झुकावं लागलं. त्यांना देश सोडून जावं लागलं असं सरन्यायाधीश आपल्या भाषणात म्हणाले होते. त्यावरूनच उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube